Home विदर्भ कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी नी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा...

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी नी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज

97
0

राजेंद्र पाटील राऊत

कृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी नी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन

ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज

डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठा अंतर्गत_ स्थानिक एसव्हीजीआय कृषी महाविद्यालय परिसरातील विद्यार्थिनीं कृषी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेत आहेत. या कृषी तंत्राचा फायदा आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना व्हावा . म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचण्याचा उद्देश आहे.
याचाच एक भाग म्हणून स्वर्गीय गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनीं शारदा शांताराम इंगळे वानखेड तालुका संग्रामपुर गावच्या शिवारात जाऊन शेतकर्‍यांना प्रत्यक्ष कृषी तंत्रज्ञानाचे धडे दिले.
वानखेड शिवारातील शेतकरी दिनेश चांडक यांच्या प्रक्षेत्रावर जाऊन विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. आधुनिक शेती, आंतर मशागत, कीड व्यवस्थापन, माती परीक्षण, याविषयी कृषिदूत शारदा शांताराम इंगळे हीने शेतकऱ्यांना विस्तृत मृदा परिक्षणाचेही परीक्षण करून दाखविले या कार्यक्रमाकरिता गावातील शेतकरी पंजाब पहुरकार, दिनेश चांडक , मोहन बावणे उपस्थित होते
कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य वाय. आर .गवई , कार्यक्रम अधीक्षक प्राध्यापक ए. ए आटोले, समुपदेशक व्ही. टी. कपले आणि प्राध्यापक एन एस सदाशिव यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here