Home कोल्हापूर विजयकुमार कुंभार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर,...

विजयकुमार कुंभार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, डॉ. अमर आडके, प्रवीण यादव आदी

138
0

राजेंद्र पाटील राऊत

विजयकुमार कुंभार यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करताना माजी आमदार डॉ.सुजित मिणचेकर, डॉ. अमर आडके, प्रवीण यादव आदी
—————————————-
विजयकुमार कुंभार यांना ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार
—————————————-

कोल्हापूर (राहुल शिंदे ब्युरो चीफ),ता. १८: डॉ. सुजित मिणचेकर फौंडेशनमार्फत देण्यात येणारा ‘आदर्श शिक्षक पुरस्कार ‘ किणी हायस्कूल किणीचे अध्यापक विजयकुमार कुंभार यांना माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर व सुप्रसिद्ध व्याख्याते डॉ.अमर आडके यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ते इंग्रजी विषयाचे एक उपक्रमशील व व्यासंगी शिक्षक . म्हणून सुपरिचित आहेत. शहीद भगतसिंग , स्वामी विवेकानंद व विविध शैक्षणिक विषयांवर व्याख्यानांच्या माध्यमातून ते समाजप्रबोधनाचे कार्य करतात. ‘ एक मूठ धान्य वंचितांसाठी ‘, यंदाची ‘दिवाळी आदिवासी बांधवांसोबत ‘ , पूरग्रस्तांना मदत इ. सामाजिक उपक्रम त्यांनी राबवले आहेत.

त्यांच्या या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.

त्यांना किणी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आण्णासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुहास माने, सचिव राजेंद्र पाटील व सर्व संचालक मुख्याध्यापिका सुरेखा शिरोटे, पर्यवेक्षक डी. एच. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

Previous articleकृषी महाविद्यालयातील विद्यार्थिनी नी केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन ब्यूरो चीफ स्वप्निल देशमुख यूवा मराठा न्यूज
Next articleपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कंचनपूर येथे कोविडचे लसीकरण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here