Home Breaking News माझी शेती माझा सातबारा, मिच लिहीणार माझा पीकपेरा’

माझी शेती माझा सातबारा, मिच लिहीणार माझा पीकपेरा’

148
0

‘माझी शेती माझा सातबारा, मिच लिहीणार माझा पीकपेरा’

ई-पिक पाहणी पंधरवाडा राबवा;

जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन

 

अकोला,दि.27(जिमाका)- शासनाने 15 ऑगस्‍ट पासून शेतकऱ्यांनी स्‍वत:च्‍या शेतामधील पिकपेरा स्‍वत: भरावा या करीता “ई-पिक पाहणी” मोबाईलअॅप विकसीत केला आहे. या मोबाईल ॲपचा वापर व जनजागृतीकरीता जिल्ह्यामध्ये दि. 23 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर या कालावधित “ई-पिक पाहणी पंधरवाडा” राबवा, असे आवाहन जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

आळंदा, ता.बार्शिटाकळी येथे शेताच्‍या बांधावर जावून “ई-पीक पाहणी” मोबाईल अॅप व्‍दारे पीक पाहणीच्‍या नोंदी मोबाईलमध्‍ये प्रात्‍याक्षिक जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी करुन “ई-पीक पाहणी” चे महत्‍त्‍व शेतकरी बांधवाना समजावून सांगितले. यावेळी उपजिल्‍हाधिकारी (महसूल) गजानन सुरंजे, मुर्तिजापूरचे उपविभागीय अधिकारी अभय सिंह मोहिते, जिल्हा सूचना अधिकारी अनिल चिंचोले, तहसिलदार गजानन हामंद, जिल्हा हेल्प डेस्क प्रसाद रानडे, प्रशांत उचितकर, सरपंच, पोलीस पाटील व शेतकरी बांधव उपस्थित होते.

 

ई-पीक पाहणी या मोबाइल अॅपद्वारे शेतकरी पिकांचे फोटो अपलोड करत असल्याने नव्याने सुमारे 250 पिकांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे. यामुळे शासनाला पिकांची अचुक माहिती मिळणार आहे. तसेच गावनिहाय पिकांची आकडेवारी उपलब्ध होणार आहे. ग्रामीण भागात गावपातळीवर महसुली लेखे ठेवण्याकरिता विविध गाव, नमुने व दुय्यम नोंदवह्या विहित करण्यात आलेल्या आहेत. यामधील गाव नमुना सात हा अधिकार अभिलेख विषयक असून गाव नमुना बारा ‘पिकांची नोंदवही’ ठेवण्या संदर्भात आहे. गाव नमुना बारा मधील पिकांच्या नोंदी अद्यावतीकरण या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने मोबाइल अॅप विकसित केले आहे. ह्या द्वारे शेतकरी प्रत्‍यक्ष शेतात जाऊन मोबाइल अॅपद्वारे पिकांचे फोटो अपलोड करु शकतात. मोबाइल अॅपमध्‍ये अक्षांश व रेखांशाची नोंद होणार असल्‍याने त्‍या शेतकऱ्याच्या शेताचे स्‍थानही तलाठयाला कळणार आहे. या अॅपवर पिकांची वर्गवारी करण्यात आली असून यामध्ये 18 वर्ग करण्यात आले आहे. कडधान्ये, तृणधान्ये, पॉलिहाऊस मधील पिके, भाजीपाला, फळे, औषधी वनस्पती आदींचा समावेश आहे. तसेच या अॅपमध्ये 580 पिकांची नोंदी घेता येणार आहेत.

गावपातळीवरून पीकपेरणी अहवालाची खरोखर व वास्तववादी माहिती संकलित व्हावी, तसेच ही माहिती संकलित करताना पारदर्शकता आणणे, पीक अहवाल प्रक्रियेत शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेणे, कृषी पतपुरवठा सुलभ करणे, नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास अचूक भरपाई आणि योग्यप्रकारे मदत करणे शक्य व्हावे, या हेतूने पीक पेरणीबाबतची माहिती ई-पीक पाहणी मोबाइल अॅपद्वारे सातबारा उताऱ्यामध्ये नोंदविण्याची सुविधा शासना कडून जिल्ह्यात उपलब्ध करून दिली आहे. या मोहिमेत सर्व शेतकऱ्यांनी उत्‍फूर्तपणे सहभागी व्‍हावे, असे आवाहन मा.जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here