Home रत्नागिरी मालगुंड तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा राजेंद्र शिंदे यांची निवड

मालगुंड तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा राजेंद्र शिंदे यांची निवड

69
0

आशाताई बच्छाव

IMG-20220823-WA0087.jpg

मालगुंड तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा राजेंद्र शिंदे यांची निवड                            रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या नव्या अध्यक्षपदी मालगुंडचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख राजेंद्र शिंदे यांची बहुमताने बिनविरोध निवड झाली आहे. राजेंद्र शिंदे यांनी यापूर्वीही मालगुंड ग्रामपंचायतीच्या तंटामुक्त गाव समितीवर अध्यक्ष म्हणून काम केले होते. त्यांच्या तत्कालीन भरीव कामगिरीची दखल घेऊन आणि सामाजिक कार्यातील त्यांचा सक्रिय सहभाग पाहता सलग दुसऱ्यांदा त्यांची बहुमताने निवड मालगुंड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत करण्यात आली आहे. यावेळी उपस्थित ग्रामस्थांमधून राजेंद्र शिंदे यांच्या नावाला सहमती दर्शविण्यात आली.

राजेंद्र शिंदे हे मालगुंड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असून गावातील अनेक अन्यायकारक गोष्टींना व दुर्लक्षित असलेल्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी सातत्याने कार्यरत असतात. तसेच गावातील विविध सामाजिक कामांमध्ये त्यांचा मोठा सक्रिय सहभाग असतो. कोरोना महामारीच्या काळातील त्यांची धाडसी कामगिरी मालगुंडमध्ये कौतुकास्पद ठरली होती. त्यांनी गावामध्ये विविध विधायक उपक्रम हाती घेण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे.

रत्नागिरी शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख, मालगुंड तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष, पर्यटन समितीने माजी अध्यक्ष आणि विद्यमान कवी केशवसुत स्मारक समिती मालगुंड सदस्य आणि मालगुंड एज्युकेशन सोसायटीचे विद्यमान उपाध्यक्ष अशा विविध पदांवर ते काम करीत आहेत. त्यांचा प्रत्येक कामातील सक्रियपणा आणि गावातील सर्व जाती-धर्माच्या लोकांशी असलेले सलोख्याचे संबंध पाहता मालगुंड गाव तंटामुक्त समितीच्या माध्यमातून अनेक विधायक उपक्रमांना पुन्हा एकदा चालना मिळेल आणि मालगुंड तंटामुक्त समितीलाही नवी संजीवनी मिळेल अशी आशा आता व्यक्त केली जात आहे.

एकूणच मालगुंड तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी नव्याने दुसऱ्यांदा राजेंद्र शिंदे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे मालगुंड ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक दुर्गवळी, ग्रामविकास अधिकारी नाथा पाटील, तलाठी रोहित पाठक, मालगुंड तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष रोहित साळवी, कवी केशवसुत स्मारक व्यवस्थापन समिती मालगुंडचे अध्यक्ष गजानन उर्फ आबा पाटील, बबन तांदळे, विलास राणे, मालगुंडचे माजी सरपंच प्रकाश जाधव, ग्रामपंचायत सदस्या सोनिया शिंदे, पत्रकार वैभव पवार, रजत पवार आदींसह अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Previous article“मायक्रो लॅब”तर्फे नाचणे येथे महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी संपन्न
Next articleउदयोन्मुख कवयित्री दीप्ती यादव यांचा प्राथमिक शिक्षक संघाच्या गुणगौरव कार्यक्रमात सत्कार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here