आशाताई बच्छाव
“मायक्रो लॅब”तर्फे नाचणे येथे महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणी संपन्न रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
महिलांच्या शारीरिक तक्रारी , मुलांची देखभाल, कौटुंबिक समस्या यामुळे धावपळीच्या जीवनात आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ नसतो. या समस्येचा विचार करुन मायक्रो लॅबने अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त महिलांसाठी मोफत हिमोग्लोबीन तपासणीचे आयोजन केले होते. नाचणे येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराला अनेक महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शवला होता. शिबिरात नाचणे ग्रामपंचायत परिसरातील ४७ जणांची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. मोफत शिबिर महिलांसाठी राबवल्यामुळे महिलांनी मायक्रो लॅबचे आभार मानले . या शिबिरावेळी मायक्रो लॅबचे नितीन पोतदार, देवल मोरे, वृषाली काळे, सानिका धुमाळ, स्वरुपा लिंगायत आदी उपस्थित होते.






