Home भंडारा महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा...

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेचे आयोजन

24
0

आशाताई बच्छाव

IMG_20240404_190048.jpg

महात्मा ज्योतिबा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाइन प्रश्नमंजुषा परीक्षेचे आयोजन

संजीव भांबोरे
भंडारा (जिल्हा प्रतिनिधी )विचार महामानवाचे नवयुवा मंच भंडारा- गोंदिया तर्फे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सदर ही स्पर्धा सर्वांकरिता खुली असून प्रथम विजेत्या क्रमांकांला ३००१ ₹ तर द्वितीय ,तृतीय, चतुर्थ क्रमांकाना अनुक्रमे २००१ ₹,१००१ ₹,५०१ ₹ आणि २५१ ₹ प्रत्येकी दोन क्रमांक उत्तेजनार्थ क्रमांकाना देण्याचे ठरविलेले आहे. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना ऑनलाइन प्रमाणपत्र मिळणार असून प्रवेश फि ही ५० ₹ रुपये ठेवण्यात आलेली आहे. परवेश मेश्राम- 7378960501, लोमेश सांगोडे- 7507866319 ह्या गुगल पे/ फोन पे नंबर वर फी भरण्याचे सांगण्यात आलेले असून ह्याच व्हाट्सअप क्रमांकावर आपला रजिस्ट्रेशन करायचे आहे . तर अधिक माहिती करता आकाश शेंडे ७६२०६२५१२६, वैभव मोटघरे ७९७२७५१७८३,हर्षल लोणारे ,७७६७०८७१६७,प्रशिक बोरकर ८५५१९७६२९८, दिपेंद्र उके ७५०७ ८६०७७८ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावे असे आयोजकांनी पत्रातून सांगितलेले आहे . सदर ऑनलाइन प्रश्नमंजुषा स्पर्धेला जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन विचार महामानवाचे नवयुवा मंच भंडारा -गोंदियाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Previous articleजिल्हा रुग्णालयात जागतिक स्वमग्न दिन संपन्न .
Next articleदि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर 6 एप्रिलला भंडारा येथे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here