Home Breaking News फळगळ रोखून संत्रा उत्पादन वाढण्यासाठी कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत –...

फळगळ रोखून संत्रा उत्पादन वाढण्यासाठी कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत – जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

82
0

फळगळ रोखून संत्रा उत्पादन वाढण्यासाठी
कृषीतज्ज्ञांनी पुढाकार घेऊन गावे दत्तक घ्यावीत
– जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

  • सतिश लाहुळकर युवा मराठा न्युज

संत्रा फळपीक जिल्ह्यातील महत्वाचे पीक आहे. संत्र्याची फळगळ थांबून जास्तीत जास्त उत्पादन मिळावे व फळगळीच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कृषी संशोधकांनी चमू तयार करून गावे दत्तक घ्यावीत व शेतक-यांना परिपूर्ण मार्गदर्शन करावे, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आज अचलपूर येथे केले.

डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, विस्तार शिक्षण संचालनालय व कृषी संशोधन केंद्रातर्फे अचलपूर येथे संत्रा फळगळ नियंत्रण व बीजोत्पादन कार्यशाळेच्या शुभारंभाप्रसंगी ते बोलत होते. कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले अध्यक्षस्थानी होते. कार्यकारी परिषद सदस्य मोरेश्वर वानखेडे, डॉ. अर्चना बारब्दे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राजेंद्र गाडे, संशोधन संचालक डॉ.विलास खर्चे, उद्यानविद्या अधिष्ठाता डॉ. प्रकाश नागरे, जिल्हा कृषी अधिक्षक अधिकारी विजय चवाळे उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे गट तयार करुन वेळोवेळी त्यांच्या समस्या सोडवाव्यात. त्यासाठी कृषी तज्ज्ञांनी पुढाकार घेऊन संत्रा उत्पादक गटांना मार्गदर्शन करावे. या प्रक्रियेत सातत्य ठेवावे जेणेकरून शास्त्रीय उपाययोजनांतून संत्रा फळगळ नियंत्रित करता येईल. शेतकरी बांधवांनी गटाच्या माध्यमातून एकत्र येऊन शेतीसंबंधी समस्या कृषी शास्त्रज्ञ, संशोधक किंवा कृषी अधिकारी यांच्यासमक्ष मांडाव्या. तज्ज्ञांनी वेळोवेळी मार्गदर्शन करावे. शेतकऱ्यांनी या पद्धतीचा अवलंब केल्यास संत्रा उत्पादन वाढीस चालना मिळेल. एखाद्या परिसरात पीक रोगाच्या संक्रमणाची माहिती मिळताच कृषी विभागाने त्यावर उपाययोजना सुचवितानाच इतर ठिकाणीही माहिती प्रसारित केली पाहिजे, असेही निर्देश त्यांनी दिले.

श्री. भाले म्हणाले, पिकांचे नियोजन, खतांचे व्यवस्थापन या तांत्रिक बाबींची माहिती संत्रा उत्पादकांना व्हावी यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सातत्यपूर्ण मार्गदर्शन व जनजागृतीसाठी यापुढेही तज्ज्ञांच्या मदतीने उपक्रम राबविण्यात येईल. श्री. गाडे, श्री. वानखडे यांचीही भाषणे झाली. संत्रा फळगळ रोखण्यासाठी मार्गदर्शनपर घडीपत्रिकेचे व केळी लागवडीचे व्यवस्थापनाबाबत माहिती पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी झाले.

Previous articleअमरावती :केमिकल फॅक्टरीची आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न; पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांनीही केली पाहणी महत्वाच्या इमारतींचे फायर ऑडिट ‘मिशनमोड’वर पूर्ण करा – पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर
Next articleमाझी शेती माझा सातबारा, मिच लिहीणार माझा पीकपेरा’
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here