केंद्रीय मंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शाब्दिक वाद हिंदू म्हणून एकत्र या
कोल्हापूर अविनाश शेलार
कोल्हापुरातील अखिल भारतीय हिंदू महासभा राष्ट्रीय उपाध्यक्ष आरती दीक्षित तसेच कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संदीप निवृत्ती साधने यांच्या वतीने सरदार तालीम जवळ शिवाजी पेठ येथे कार्यालयात आज तातडीची बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय मंत्री नारायण राणे व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि शिवसेना कार्याध्यक्ष तसेच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे कार्यकर्ते यांच्यामध्ये धुमशान होत आहे याबद्दल हिंदू म्हणून एकत्र येऊन हा वाद संपवा अशी प्रामाणिक इच्छा व्यक्त करून त्या संदर्भात निवेदन जाहीर करण्यात आले तसेच मुख्यमंत्री कक्ष व नारायण राणे यांच्या केंद्रीय मंत्री कक्ष यांच्याकडे सोशल मीडियाद्वारे पाठवण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप निवृत्ती सासणे म्हणाले की हिंदु धर्मातील सर्व राजकीय पक्षातील नेत्यांनी एकत्र येऊन हा वाद संपवा वा परकीय धर्मातील काही तालीबानी वृत्तीच्या लोकांनी हा वाद पेटला असून केंद्रीय व राज्य पोलिसांनी याचा छडा लावावा तसेच हिंदू धर्मातील सर्व कार्यकर्त्यांनी संयम राखून या घटनेला हिंसक वळण लावू नये अशी जिल्हाध्यक्ष म्हणून मी विनंती करत आहे तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष आरती दीक्षित यांनी ही असे प्रतिपादन केले
यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्ष आरती दीक्षित महाराष्ट्र महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष निरंजन दीक्षित विनोद चोपडे ग्रामीण संपर्क अध्यक्ष विजय शिंदे तसेच पत्रकार संजीव कुलकर्णी ओम प्रकाश शेलार जितेंद्र चव्हाण आदी कार्यकर्ते उपस्थित होते