Home Breaking News मेडशी येथील मस्जिद बनली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

मेडशी येथील मस्जिद बनली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

130
0

मेडशी येथील मस्जिद बनली राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक

हिंदू-बौद्ध बांधवांना कुराण ग्रंथाचे वितरण

मालेगाव तालुका प्रतिनिधी प्रकाश भुरे :

हिंदू मुस्लिम समाजात प्रेम बंधुता आणि सलोख्याचे संबंध प्रस्थापित होण्याच्या दृष्टीकोनातून मुस्लिम युवकांनी हिंदू–बौद्ध- मुस्लिम बांधवांना मोमीनपूरा मस्जिदमध्ये एकत्रित करत मस्जिद परिचय मेळावा घडवून आणल्याने राष्ट्रीय एकात्मता जोपासल्या गेली आहे.
सद्यस्थितीला जगभरात जातीयवादाचे राजकारण होत असुन मताची बेरीज बजाबाकी करण्यासाठी राजकीय नेते तरबेज असताना मेडशी येथील मेळावा जातीयवाद्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे ठरले.
मेडशी येथे हिंदू मुस्लिम बौद्ध समाज मोठ्या प्रमाणात आहे.राष्ट्रीय एकात्मता जोपासणारे गाव म्हणून गावाची ओळख आहे येथील ग्रामस्थ एकमेकांच्या धार्मिक उत्सवात सहभागी होऊन सण साजरे करत असल्याचा इतिहास आहे. नवीन पिढीत सलोखा कायम रहावा यासाठी मुस्लिम युवकांनी पुढाकार घेत चक्क मोमीनपुरा मस्जिदमध्ये हिंदू -मुस्लिम- बौद्ध बांधवांसाठी मस्जिद परिचय मेळाव्याचे आयोजन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच शेख जमिरभाई यांची उपस्थिती लाभली.प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी संतोष साठे ,उपसरपंच प्रतिनिधी धीरज मंत्री, माजी सरपंच रमजान गौरे,माजी पंचायत समिती गजानन शिंदे, तंटामुक्ती अध्यक्ष ज्ञानदेव साठे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष विनोद तायडे,माजी तंटामुक्ती अध्यक्ष शौकत पठाण,सुभाष तायडे, माजी सेवानिवृत्ती वनाधिकारी मधुकर तायडे, ग्राम पंचायत सदस्य अभिजित मेडशिकर, मूलचंद चव्हाण,जगदिश राठोड, अमोल तायडे,उल्हासराव घुगे, चंद्रकांत घुगे, गोरख भागवत,अजय चोथमल ,सोयल पठाण, विठ्ठल भागवत, अजय वाकोडे,सचिन साठे,सुधाकर चोथमल यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला हाफिज मोहम्मद रिहान या चिमुकल्याने अरबी भाषेतील मुखपाठ असलेले कुराण शरीफ पठण करून उपस्थितांना अवाक केले. याप्रसंगी अडव्होकेट अफझल गाजी,इशतीयाक अहमद,मुख्तार सर,सनाउल्ला टेलर मौलवी शुजाउद्दीन आदींनी अजाण ,कुराण,मस्जिद याबाबत माहिती दिली तर डॉ बिलालभाई यांनी चक्क हिंदू धर्म ग्रंथावर प्रवचन दिले. यप्रसंगी मान्यवरांचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ आणि मराठी अनुवादित कुराण ग्रंथ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांना शिरखुरमाचे वितरण करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यांनी केले तर आभार यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी हाजी बद्रोद्दीन,फिरोज बागवान,रन्नु रेघिवाले,छट्टू गौरे,खन्नू गौरे,उस्मान रेघिवले, मेहबूब गौरे,मजहर बागवान,कय्युम बागवान,रमजान गौरे, कलीम परसुवाले,राजदार पठाण,शेख अय्यजभाई, शेख एफाज, आदीसह मुस्लिम युवकांनी अथक परिश्रम घेतले.

प्रतिनिधी प्रकाश भुरे मालेगाव वाशीम

Previous articleपावसाने घर कोसळून आर्थीक नूकसान 
Next articleकेंद्रीय मंत्री नारायण राणे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शाब्दिक वाद हिंदू म्हणून एकत्र या
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here