Home Breaking News मन्याड खोऱ्यातील दिनदुबळयांचे कैवारी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई गुरूनाथराव कुरूडे साहेब यांना महाराष्ट्र...

मन्याड खोऱ्यातील दिनदुबळयांचे कैवारी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई गुरूनाथराव कुरूडे साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

127
0

मन्याड खोऱ्यातील दिनदुबळयांचे कैवारी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक भाई गुरूनाथराव कुरूडे साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

नांदेड प्रतिनिधी / राजेश भांगे

शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते, जेष्ठ स्वातंत्र्यसैनानी माजी आमदार व श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी शैक्षणिक संस्थेचे सचिव मन्याड खोऱ्यातील दिनदुबळयांचे कैवारी भाई गुरूनाथराव कुरूडे साहेब यांना यंदाचे सन २०२१ चे महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्र राज्य च्या वतिने महाराष्ट्र भुषण जिवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे.

हा पुरस्कार माजी आमदार भाई गुरूनाथ राव कुरूडे साहेब यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी जाहीर करण्यात आला आहे.

श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी सोबत काम करतांनाच जेष्ठ स्वातंत्र्यसैनानी माजी आमदार भाई गुरूनाथ राव कुरूडे साहेब यांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणण्यासाठी विविधांगी काम केले असुन त्यांना मन्याड खोऱ्यातील दिनदुबळयांचे कैवारी म्हणून सुद्धा ओळखले जाते.

मा. गुरूनाथ राव कुरूडे साहेबांनी सामाजिक क्षेत्रात तर क्रांती घडवून आणलीच परंतु कंधार व नांदेड सह वाडितांनड्यापासुन ते महाराष्ट्रातील कानाकोपऱ्या पर्ऱ्यंत शिक्षणाची गंगा वाहीली व तसेच तळागाळातील शोधित पिडित लोकांच्या लेकराबाळांना मोफत शिक्षण मिळावे व शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक उत्क्रांती व्हावी या उद्देशाने समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत विविधांगी कार्याच्या माध्यमातून ते पोहचावे म्हणून सतत कार्यरत राहीले‌.
म्हणुनच त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी ची दखल घेऊन महात्मा कबीर समता परिषद महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी आमदार जेष्ठ स्वातंत्र्यसैनानी भाई गुरूनाथ राव कुरूडे साहेब यांना या वर्षी चार २०२१ चा जिवन गौरव पुरस्कार जाहीर झाला असून या पुरस्काराच्या निवडीचे पत्र महात्मा कबीर समता परिषद चे संस्थापक डॉक्टर श्री मुकुंदराव पाटील, सौ. अर्चना ताई, सौ.आश्विनीताई कांबळे, व इतर मान्यवरांनी बहाद्दरपुरा येथील सुलोचना या त्यांच्या निवासस्थानी येवून जिवनगौरव पुरस्कार निवडीचे पत्र देऊन पुढील कार्यक्रमासाठी निमंत्रण दिले.

या निवडीबद्दल कुरूडे साहेबांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

तर या प्रसंगी प्राध्यापक श्री वैजनाथराव कुरूडे, उल्हास मेमोरियल ट्रस्ट संचलित मुख्याध्यापक तथा सर्व कर्मचारी,
कैलासवासी राज्याराम देशमुख माध्यमिक विद्यालय टेळकि, तालुका लोहा येथील मुख्याध्यापक व सर्व कर्मचारी, कंधार वकिल महासंघाचे अध्यक्ष अॅडवकेट दिलिप कुरूडे साहेब, प्रदिप इंदुलकर सर, जाधव मामा व मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यकर्ते व मित्रमंडळी उपस्थित होते.

Previous articleसन साई ग्रुप पालघर कडून छत्री चे वाटप.
Next articleशेतकऱ्यांना वाली कोण? सटाणा, साक्री, पिंपळनेर, रस्ता दुरवस्था शेतमालाची नुकसान भरपाई कोण देणार गजानन साळवे यांचा लोकप्रतिनिधी ना प्रश्न? 
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here