Home नांदेड मुखेड तालुक्यातील तांदळी येथे शेतातील घरास आग लागून गृहपयोगी वस्तू, रोख रक्कम...

मुखेड तालुक्यातील तांदळी येथे शेतातील घरास आग लागून गृहपयोगी वस्तू, रोख रक्कम जळून खाक..

102
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील तांदळी येथे शेतातील घरास आग लागून गृहपयोगी वस्तू, रोख रक्कम जळून खाक..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील मौजे तांदळी येथील माधव शंकर जाधव रा. तांदळी यांच्या शेतातील पत्राच्या घरास राहात होते .दिनांक 25 एप्रिल रोजी पहाटे पाच वाजेच्या सुमारास अचानक घरास आग लागली. या आगीत संपूर्ण घरच पेट घेतल्याने घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. अचानक आग लागून घरातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले त्यात सर्व जीवनावश्यक वस्तू ज्वारी 10 पोते, गहू 5 पोते, तुर 5 पोते, मुग 2 पोते, डाळ व तांदूळ 2 पोते, वापरण्याचे कपडे , अद्रक बेणे, दागदागिने व हळद विकून दोन लाख रुपये आलेले डब्यात ठेवले होते. हे संपूर्ण जळून खाक झाले. व तसेच कांदा विकलेले तीस हजार रुपये असे एकूण दोन लाख 30 हजार रुपये जळून खाक होऊन शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. तसेच पॅशन प्रो हिरो कंपनीची मोटरसायकल अर्धवट जळाली. अशा प्रकारे मोठे नुकसान होऊन कुटुंब बेघर होऊन उघड्यावर आले. आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.होकर्णा सज्जाचे तलाठी श्री ए. एन. करटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रीतसर पंचनामा केला. मात्र पहाटे पाच वाजेच्या दरम्यान घरास अचानक आग लागली. ही घटना शेजाऱ्यांना व गावकऱ्यांना समजताच त्यांनी आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र संपूर्ण घरच पेटल्याने आग विझविण्यासाठी बराच वेळ लागला. त्यात संसारोपयोगी साहित्य, रोख रक्कम, धान्य जळून खाक झाल्याने निवारा गेला. त्यामुळे राहण्याचा व खाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने आर्थिक संकटात ते सापडले आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यास प्रशासनाने तात्काळ मदत जाहीर करून सहकार्य करावे अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

Previous articleराजधानीचे अजमीर सौंदाणे …! माझं गांव;माझा अभिमान!!
Next articleउंद्री (प.दे.) ता.मुखेड येथे अंगणवाडी इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन श्री हनमंतराव पाटील बेटमोगरेकर यांच्या हस्ते संपन्न..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here