Home कोल्हापूर गोकुळ दूध टँकर मधून माजी आमदारांना १० वर्षात १३४ कोटी मिळाले

गोकुळ दूध टँकर मधून माजी आमदारांना १० वर्षात १३४ कोटी मिळाले

126
0

राजेंद्र पाटील राऊत

गोकुळ दूध टँकर मधून माजी आमदारांना १० वर्षात १३४ कोटी मिळाले

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ’)च्या टँकरमधून माजी आमदार महादेवराव महाडिक यांना गेल्या दहा वर्षांत तब्बल १३४ कोटी रुपये मिळाले आहेत. अनेक वर्षे ‘व्यंकटेश्वरा गुड्स मूव्हर्स’ व ‘कोल्हापूर आइस कोल्ड स्टोरेज’च्या माध्यमातून संघाचा मलिदा लुटण्याचे काम त्यांनी केल्याचा आरोप पालकमंत्री सतेज पाटील यांनी केला. ‘गोकुळ’चा व्यवहाराची माहिती घेतल्यानंतर डोळे फिरले असून, संघाच्या पूर्वीच्या नेत्यांचा कारभार उत्तर कोरियाचे प्रमुख किम जोंगसारखा होता, अशी बोचरी टीका ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी येथे केली.
सतेज पाटील म्हणाले, रोज मिळणारा मलिदा वाचवण्यासाठीच महाडिक संघाच्या निवडणुकीत ‘३:१३:२३’ तारखेचे तुणतुणे वाजवत होते.
त्यांचा ‘गोकुळ’मधील स्वार्थ लोकांसमोर आल्यानेच सत्तांतर झाले. पाटील यांनी महाडिक यांना प्रत्येक वर्षी टँकर भाड्यापोटी किती रक्कम मिळाली याचा गेल्या दहा वर्षांतील वर्षनिहाय रकमेचा चार्टच यावेळी पत्रकारांना उपलब्ध करून दिला. टँकर भाड्यापोटी महिन्याला किमान १ कोटी रुपये त्यांना संघातून मिळत होते, हे त्यावरून स्पष्ट झाले.
कोल्हापूर जिल्हा बँकेकडून म्हैस, गाय खरेदीसाठी ५०० कोटी ‘गोकुळ’च्या म्हैस दुधाला चांगली मागणी असून, दूध वाढीसाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून नवीन कर्ज योजना सुरू करत आहे. आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून पाचशे कोटी कर्जाचे वाटप करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

Previous articleमौजे हिप्परगा (माळ) येथे शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा.
Next articleगिरनोलीत आग लागून संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांना खासदा रां कडून आर्थिक मदत
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here