Home माझं गाव माझं गा-हाणं गिरनोलीत आग लागून संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांना खासदा रां कडून आर्थिक मदत

गिरनोलीत आग लागून संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांना खासदा रां कडून आर्थिक मदत

116
0

राजेंद्र पाटील राऊत

गिरनोलीत आग लागून संसार उघड्यावर पडलेल्या कुटुंबियांना खासदा रां कडून आर्थिक मदत

पालघर (गिरनोली वैभव पाटील विभागीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क )-सोमवार दिनांक ७ जुन २०२१
पालघर तालुक्यातील गिरनोली येथे चक्रीवादळा नंतर शॉर्ट सर्किटने आग लागून घर उध्वस्त झालेल्या केतन पाटील यांच्या मदतीसाठी खासदार राजेंद्र गावित यांनी धाव घेत आर्थिक मदत केली. खासदार यांनी २० हजार रुपयांची रोख रक्कम मदत केली. पालघर तालुक्याच्या पूर्व भागातील सुर्या नदी काठच्या गिरनोली गावात २५ मे मंगळवारी रात्री साडे आठ वाजताच्या सुमारास कविता पाटील आणि भूषण पाटील यांच्या राहत्या घराला आग लागली होती. तारापूर औद्योगिक वसाहतीच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. परंतु आगीत राहते घर भस्मसात झाले असून लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्य जाळून खाक झाल्याने बेताची आर्थिक परिस्थिती असलेले पाटील कुटुंबीय हवालदिल झाले आहे
२५ मे मंगळवारी रात्री घराला आग लागली त्यावेळी घरातील पुरुष मंडळी कामानिमित्त घराबाहेर होती.घराला आग लागल्याची माहिती मिळताच गिरनोली गावच्या ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले होते.परंतु आगीने रुद्र रूप धारण केल्याने , अग्निशमन दलाचा एक बंब घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.आगीत घरासह संसारोपयोगी साहित्य जळुन खाक झाले आहे. पाटील कुटुंबियांचे सुमारे सव्वा सहा लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. महसूल विभागाकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या पाटिल कुटुबाला शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख वैभव संखे यांनी १५ हजाराचा धनादेश सुपूर्द केला.संखे यांनी जीवनावश्यक वस्तूही याआधी पाटील कुटुंबियांना दिल्या होत्या. यावेळी खासदार यांनी वीज निरीक्षक यांच्याशी चर्चा करून त्यांना महावितरणमार्फत तात्काळ मदत मिळवून द्यावी अशा सूचनाही केल्या. शिवसेनेचे जिल्हा सह समन्वयक केदार काळे यांनी या कुटुंबियांच्या सरकारी मदतीसाठी खासदार उच्च पातळीवर प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावतील असा विश्वास यावेळी व्यक्त केला. खासदार यांच्यासमवेत यावेळी , वैभव संखे, दापोली उपसरपंच हेमंत संखे व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here