Home जळगाव दारू विक्री बंद करण्यासाठी मेहूणबारे पोलीसांचे पथक

दारू विक्री बंद करण्यासाठी मेहूणबारे पोलीसांचे पथक

140

आशाताई बच्छाव

IMG_20231209_081040.jpg

दारू विक्री बंद करण्यासाठी मेहूणबारे पोलीसांचे पथक

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- मेहूणबारे पोलीस स्टेशन हद्दीतील अवैध दारू विक्रीच्या पार्श्वभूमीवर मेहूणबारे पोलीसांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. पोलीसांनी गेल्या तीन दिवसात देान गावठी हातभट्ट्यांवर कारवाई करून हजारो रूपयांचा दारू तयार करण्याचे रसायन जप्त केले. तर मेहूणबारे पोलीस व उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त कारवाईत लोंढे येथील दोन हॉटेलवर छापा टाकण्यात येवून देशी विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे.
तीन दिवसापूर्वी सायगाव येथे गिरणा नदीकाठावर असलेली हातभट्टी नष्ट केली होती.येथून सुमारे 40 हजार रूपयांचे कच्चे पक्के रसायन व तयार दारू जप्त केली होती. रहीपुरी शिवारात गिरणा नदीच्या काठावर झाडा झुडपांच्या आडोश्याला असलेल्या गावठी हातभट्टीवर पोलीसांनी 7 रोजी छापा टाकून सुमारे 27 हजार 500 रूपये किंमतीचे कच्चे पक्के रसायन व तयार गावठी दारू जप्त केली.
ही कारवाई एएसआय मिलींद शिंदे, पोकॉ. गोरख चकोर, गोकुळ लोहार, जितु परदेशी यांच्या पथकाने सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी यंाच्या मार्गदर्शनाखाली केली.याप्रकरणी सागर मोरे याच्या विरूद्ध मुंबई प्रोव्हीशन अॅ्नट कलम 65 (फ)(ब)(क)(ई)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहूणबारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी,हवालदार मोहन सोनवणे, पोकॉ. भूषण पाटील व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक आर आर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत दरेगाव लोंढे गावातील देान हॉटेलांवर छापे टाकले असता तेथे अवैधरित्या देशी विदेशी दारू विक्री करतांना दोघे आढळून आले.या दोन कारवायात 3 हजार 410 रूपयांची देशी दारू जप्त करण्यात आली असून दोघांच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क कार्यालय चाळीसगाव येथे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Previous articleजिव्हाळा मिञ परीवार व महामानव गृप च्या वतिने संग्रामपुर येथे रक्तदान शिबिर संपन्न
Next articleचाळीसगावात अमरावती एक्सप्रेस समोर एकाची आत्महत्या
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.