Home जळगाव चाळीसगावात अमरावती एक्सप्रेस समोर एकाची आत्महत्या

चाळीसगावात अमरावती एक्सप्रेस समोर एकाची आत्महत्या

40
0

आशाताई बच्छाव

IMG_20231209_081456.jpg

चाळीसगावात अमरावती एक्सप्रेस समोर एकाची आत्महत्या

चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- चाळीसगाव ते वाघळी दरम्यान अमरावती एक्सप्रेस समोर येत एकाने आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवार दि.8 रोजी पहाटे घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पेालीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणाची ओळख पटून आलेली नाही.
वाघळी ते चाळीसगाव दरम्यान अप लाईन खंबा क्र.331/28 ते 332/2 दरम्यान अमरावती एक्सप्रेस क्र.12112 समोर एका अनोळखी पुरूषाने आत्महत्या केली. या इसमाचे वय अंदाजे 30 ते 35 वर्षे असून शरीराने मजबूत, अंगात फिक्कट पोपटी रंगाचे फुल बाहीचे टी शर्ट, पांढऱ्या रंगाचा बनियन व
पायात पिवळ्या रंगाची पॅन्ट,रंग काळा, उंची 5.5 फुट, डो्नयाचे व दाढीेचे केस काळे असे वर्णन या इसमाचे असून याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.या अनोळखी पुरूषाबाबत काही माहिती असल्यास त्यांनी चाळीसगाव शहर पोलीसंाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. तपास हवालदार पंकज पाटील करीत आहेत.

Previous articleदारू विक्री बंद करण्यासाठी मेहूणबारे पोलीसांचे पथक
Next articleचोरी झाल्यावर काही तासातच 6लाख 85 हजार रूपये किंमतीच्या मुद्देमालासह चोरट्यास केले अटक…. चाळीसगाव पोलिसांची कामगिरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here