Home मुंबई धनुष्यबाण ना ठाकरेंचे ना शिंदेंचे..! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नाव...

धनुष्यबाण ना ठाकरेंचे ना शिंदेंचे..! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नाव ही नका वापरू..?

90
0

आशाताई बच्छाव

IMG-20221008-WA0048.jpg

धनुष्यबाण ना ठाकरेंचे ना शिंदेंचे..! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नाव ही नका वापरू..?

मुंबई (जिल्हा प्रतिनिधी,अंकुश पवार, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल अँड पेपर)

गेल्या काही दिवसांपासून ‘धनुष्यबाण’ चिन्हाबाबत सुरू असलेला वाद अखेर संपुष्टात आला आहे. आज निवडणूक आयोगाचा याबाबत मोठा निर्णय घेत ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंसाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे.
निवडणूक आयोगाने काय म्हटले?
दोन्ही गटाला ‘धनुष्यबाण’ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच दोन्ही गटाला शिवसेना हे नावही वापरता येणार नाही. मात्र, दोन्ही दोन्ही गटाला ठाकरे गट आणि शिंदे गट अशी नावे वापरता येऊ शकतात. आता पुढे हे धनुष्यबाण चिन्ह अंधेरी पोट निवडणुकीसाठी तात्पुरते गोठवले असेल तरी मोठा धक्का हा उद्धव ठाकरे यांना बसलेला दिसून येतो आहे. येत्या सोमवारी निवडणूक आयोग नवीन चीन्हासाठी पर्याय देणार आहे त्यापैकी एक चिन्ह ठाकरे गट व शिंदे गट यांना वापरता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here