Home मुंबई तुम्ही फक्त साथ द्या! पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन पण नक्की कोण...

तुम्ही फक्त साथ द्या! पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन पण नक्की कोण आदित्य की तेजस ठाकरे..? सामान्य, मध्यमवर्गीय शिवसैनिक लायक नाही का..?

145

आशाताई बच्छाव

IMG-20221008-WA0025.jpg

तुम्ही फक्त साथ द्या! पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवीन पण नक्की कोण आदित्य की तेजस ठाकरे..? सामान्य, मध्यमवर्गीय शिवसैनिक लायक नाही का..?

मुंबई : (जिल्हा प्रतिनिधी, अंकुश पवार, युवा मराठा वेब न्यूज चॅनेल अँड पेपर)

बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पार पडला असून शिवाजी पार्कवर सालाबादप्रमाणे शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात एकनाथ शिंदे, भाजपा, देवेंद्र फडणवीस अशा सर्वांवरच तुफान टोलेबाजी केली.
गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि ते दसरा मेळावा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवाजीपार्क वर घेतला आहे. त्यात ते सर्व शिवसैनिकांना संबोधित करताना तुम्ही फक्त साथ द्या,पुढचा मुख्यमंत्री शिवसेनेचा करून दाखवतो असे विधान केले परंतु सध्या प्रश्न असा आहे की वारसाहक्काने आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार का..? सामान्य निष्ठावान शिवसैनिक मुख्यमंत्री का होऊ शकत नाही. की फक्त ह्याचे मुल, नातेवाईक, नातू हेच पिढ्यानपिढ्या राजकारणात अधिराज्य गाजविणार आपले मूल ह्याच्या मागे आपले आयुष्य बरबाद करणार असा प्रश्न कोणी उघडपणे बोलून दाखवत नसले तरी सर्व सामान्य जनतेला आणि निष्ठावान शिवसैनिक यांना पडला आहे.
सद्या ठाण्यात ६६ नगरसेवक आहेत त्यापैकी ३० नगरसेविका ह्या जे ३० नगरसेवक आहेत त्यांच्या पत्नी आहेत. सर्वच महाराष्ट्रात हीच परिस्थिती सर्व राजकीय पक्षात आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी राजकारणात विना घराणेशाही , सामान्य कुटुंबातील लोक यावीत म्हणून स्मार्ट लोकशाही उपक्रम ठाण्यात सुरू आहे.
दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उघडपणे व्यक्त झाले शिवसेना ना उध्दव ठाकरेंची ना एकनाथ शिंदे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे व सामान्य शिवसैनिकांची आहे. विषय फक्त शिवसेना पक्षाचा नसून सर्वच राजकीय पक्षांना याचे चिंतन करणे गरजेचे आहे. सामान्य मध्यमवर्गीय जनतेने ही पुढची पिढी यांच्या मुलांची गुलाम होण्यापासून रोखले पाहिजे.
उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर टीका करताना काय कमी दिलं त्यांना? बाप मंत्री, कार्ट खासदार.. कुणाचा आमदार.. पुन्हा डोळे लावून बसलेत की नातू नगरसेवक होणार. अरे त्याला मोठा तर होऊ दे. पण यांचं सगळं ध्येय काही एकच.. सगळं माझ्याकडेच हवंय, अशा शब्दांत त्यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली. परंतु उद्धव साहेब एका निःपक्षपाती, कोणत्याही राजकीय पक्षाला विकल्या न गेलेल्या माझ्या सारख्या पत्रकाराचे मत जरा वेगळे आहे l. एकनाथ शिंदे जेव्हा धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या सोबत असायचे तेव्हा त्यांनी घरावर तुळशीपत्र ठेवून अहोरात्र जनतेची काम केलेत केसेस अंगावर घेतल्यात, आंदोलन केलेत आपला युवराज आदित्य ठाकरे यांना पहिल्या टर्म मध्ये मंत्री, आमदार करताना आपल्याला काही वाटले नाही की अरे आदित्यचा वयाची मुलं एमपीएससी,पोलिस,खासगी कामात रोज ट्रेन चे धक्के खात आयुष्य घालवत आहेत. परीक्षा देत निकालाची वाट पाहत आहेत. आपला मुलगा पहिल्या टर्म मध्ये मंत्री केला जनतेला तरी काय वाटेल याचा विचार केला होता का..? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे खासदार आधी डॉक्टर आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी शिंदे परिवारावर जो वाईट प्रसंग आला होता त्यावेळी सहानुभूती दाखवून त्यांना मार्ग दाखविला होता परंतु आपल्या प्रत्येक भाषणात राजकारणात सहानुभूती,भावनिक आवाहन या शिवाय आपण काही नवीन जनतेला देत नाहीत. त्यापलीकडे ही राजकारण असते याची प्रतीती घ्या.
स्मार्ट लोकशाही उपक्रम हा फक्त ठाणे जिल्ह्यात सुरू आहे सर्व राजकीय पक्षांनी असेच सुरू ठेवले तर सर्व महाराष्ट्रात पसरले कारण तुमचा पक्षातील सर्व सामान्य कार्यकर्ता मग तो कोणत्याही जातीचा,धर्माचा,विभागातला कोणत्याही शासकीय/ निमशासकीय अधिकारी/कर्मचारी,मजूर,हमाल, सर्व व्यवसाय करणारे यापैकी असोत त्यांना काही काळाने तुमच्या या राजकारण आणि तुमच्या परीवरापेक्षा आपला परिवार ,मुल,नातेवाईक,मुलांचे भविष्य जास्त प्रिय ठरेल.
त्यामुळे आपल्या दसरा मेळाव्यातील भाषण छान झाले परंतु पुन्हा शिवसेनेचा मुख्यमंत्री तुम्ही करणार तो कोण…? याचे गूढ येणाऱ्या आगामी निवडणुकीत सर्व जनतेच्या मनात राहील..

Previous articleनाशिकला ट्रँव्हल्स बस पेटून ११ जणांचा होरपळून जागीच मृत्यू
Next articleधनुष्यबाण ना ठाकरेंचे ना शिंदेंचे..! निवडणूक आयोगाने ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठवलं; शिवसेना नाव ही नका वापरू..?
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.