राजेंद्र पाटील राऊत
भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मास्क व सानीटायझर चे वाटप..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज देगलूर येथे देगलूर शहर व तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने व महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्य मास्क व सँनिटायझर वाटपाचा उपक्रम नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर साहेबांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला, त्यामध्ये सर्व शासकीय कार्यालय,मजूर, कामगार कर्मचारी व गरजु लोकांना मास्क व सानीटायझरचे वाटप करण्यात आले.
यावेळी देगलूर तालुका अध्यक्ष प्रितम देशमुख हाणेगावकर, महाराष्ट्र युवक कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस जितेश अंतापुरकर, नांदेड जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा सौ. कविताताई कळसकर, माजी स्थाई समिती सभापती शमीम भाई, नांदेड जिल्हा मागासवर्गीय सेल अध्यक्ष गंगाधर सोंडारे, नांदेड जिल्हा कॉंग्रेस कमिटी सरचिटणीस नारायणराव श्रीमनवार, देगलूर शहर व तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.