आशाताई बच्छाव
अशोकनगर मध्ये भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी
श्रीरामपूर, दिपक कदम तालुका प्रतिनिधी ::– अशोकनगर वार्ड नंबर तीन मध्ये भगवान गौतम बुद्धांची दोन हजार पाचसे एकोणसाठ वी जयंती साजरी करण्यात आली.भगवान गौतम बुद्धांच्या जयंती निमित्ताने प्रथम ध्वजारोहण करून परमपूज्य भगवान गौतम बुद्ध,डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर बौद्धाचार्य भाऊसाहेब हिवराळे व निवृत्ती पगारे यांनी त्रिसरण,पंचशील,बौद्ध पूजा, भीमस्मरण,भीमस्तुती हे धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले हे सर्व झाल्यानंतर अशोकनगर कारखान्याचे माजी चेअरमन सोपान नाना राऊत यांनी आलेल्या सर्व भाविकांना गौतम बुद्धांच्या जयंती निमित्ताने हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामपंचायत निपाणी वडगावचे माजी सरपंच मुरलीनाना राऊत यांनी आपल्या भाषणात भगवान गौतम बुद्धांनी जगाला शांतीचा,प्रितीचा,एकतेचा संदेश देऊन संपूर्ण मानव जातीला एक नवीन रस्ता दाखवून दिला.असे सांगितले त्याचप्रमाणे निपाणीवडगांव ग्रामपंचायतचे माजी सरपंच रवींद्र पवार यांनी सर्व बौद्ध धर्मीयांना शुभेच्छा दिल्या सामाजिक कार्यकर्त्या मीराताई पारधे यांनी देखील सर्वांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमात अतिशय महत्त्वाची बाब म्हणजे ओवी प्रसाद काळे या आठ वर्षे मुलींने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर पोवाडा गाऊन सर्व पाहुण्यांची व आलेल्या भाविकांची मने जिंकली. सर्व पाहुण्यांनी तिच्यावर कौतुक आणि बक्षीसांचा वर्षाव केला. या कार्यक्रमाकरीता प्रमुख पाहुणे म्हणून अशोक कारखान्याचे माजी चेअरमन सोपाननाना राऊत,निपाणी वडगाव चे माजी सरपंच रवींद्र पवार, मुरलीनाना राऊत,आबासाहेब राऊत निपाणी वडगाव चे विद्यमान सरपंच योगिताताई देवकर व उपसरपंच जगन्नाथ जाधव, सामाजिक कार्यकर्ते योगेशभाऊ देवकर, मीराताई पारधे, बाळासाहेब ढोरमारे जाधव सर,दांडगे सर,ज्योतीताई कदम,भैरवनाथ ढोरमारे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी सरणत्तय घेऊन आलेल्या सर्व पाहुण्यांना व भाविकांना खिरदान करण्यात आली. या कार्यक्रमाकरिता अशोकनगर व निपाणी वडगाव परिसरातील शारदाताई पारखे,छायाताई थोरात,श्यामल जाधव, शारदाताई थोरात,उज्वलाताई जाधव, सविताताई बोरुडे,सीताताई बोरुडे, रोहिणी दांडगे,भिमाबाई येवले, दिपाताई जाधव,उषाताई साळवे, शारदाताई साळवे, पूर्णाबाई थोरात, रोहिणी बोरुडे,पल्लवी थोरात, चंद्रकलाताई थोरात,आशा पारखे, दीक्षाताई साळवे, वैशालीताई काळे पद्माताई बोराडे,लक्ष्मण मोरे, अजय साळवे,उमेश जाधव,अजय जाधव,दिलीप जाधव,ताराचंद पारधे, रामदास बोरगे,सिद्धार्थ थोरात, सार्थक साळवे, मुरलीधर साळवे, किरण हिवराळे,अतुल बोरुडे, अजय वैरागर,रऊंफभाई सय्यद, जुबेरभाई सय्यद,संगीता हिवराळे,महालेताई, करूणा हिवराळे,राणी हिवराळे, रंजना दाभाडे,संतोष जाधव,सविता जाधव,सुनिता शिंणगारे,कुसुम त्रिभुवन,शकुंतला साळवे,बेबी शिरसाट,द्वारका पारखे,लक्ष्मीबाई मकासरे,,सुरेखा चक्रनारायण, मंगलाबाई कदम या सह अनेक भाविक हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता अशोक बोरुडे,गणेश थोरात,नंदू जाधव,अरुण बोरुडे यांनी परिश्रम घेतले. तर शेवटी सर्वांचे आभार प्रशांत राजेंशिंदे यांनी मानले.






