आशाताई बच्छाव
“राजमाता जिजाऊ वस्तीगृहाचा यशदीप तेजोमय — दहावीतील घवघवीत निकालाने सर्वत्र गौरव”
मराठवाडा विभागीय संपादक मनोज बिरादार
मुखेड,पंधरा वर्षांपासून सातत्याने शैक्षणिक यशाचे शिखर गाठणाऱ्या मुखेड येथील राजमाता जिजाऊ वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी यंदाही आपली उज्वल परंपरा कायम राखत दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२५मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, वस्तीगृहातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले निकाल प्रेरणादायी ठरले आहेत.
गणेश विजय टापरे या विद्यार्थ्याने तब्बल ९३.६०% गुण मिळवून वस्तीगृहाचा नाव उज्वल केले असून त्याच्यासह अन्य विद्यार्थी देखील उल्लेखनीय यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.
प्राप्त गुणांनुसार प्राविण्य प्राप्त विद्यार्थी पुढीलप्रमाणे:
गणेश विजय टापरे – ९३.६०%
कृष्णा मनोज जायभाये – ९०.२०%
खंडू हनमंत गोंदलवाड – ८८.२०%
गजानन पंडित जाधव – ८८.००%
महेश मारुती वडजे – ८७.४०%
शिवानंद विठ्ठल हिवराळे – ८६.८०%
बजरंग माधव वडजे – ८४.६०%
या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षणच नव्हे, तर संपूर्ण विषयांचे ट्यूशन, अभ्यासातील अडचणींवर सखोल मार्गदर्शन आणि आत्मविश्वास यामुळेच हे यश साध्य करता आले आहे.
या यशामागे राजमाता जिजाऊ वस्तीगृहाचे संचालक गंगाधर वसंतराव बिरादार सर यांचे भरीव योगदान असून, त्यांच्या शैक्षणिक दूरदृष्टीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना संधी मिळाली आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे वस्तीगृह आज महाराष्ट्रात प्रेरणादायी मॉडेल ठरत आहे.
मुखेड तालुक्यातील शिक्षक, पालक, आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी विद्यार्थ्यांसोबतच बिरादार सर यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील योग्य मार्गदर्शन आणि कष्टाच्या जोरावर मोठं यश संपादन करू शकतात याचे हे उत्तम उदाहरण ठरले आहे.
शिक्षणाने घडते संस्कार, यशाच्या दिशेने ठाम पाऊल – राजमाता जिजाऊ वस्तीगृहाचा दीप तेजोमय झाला.






