Home जालना निरंकारी भक्तगणांकडून समर्पण दिवसानिमित्त बाबा हरदेवसिंहजी यांना श्रद्धा सुमने अर्पित समर्पण फक्त...

निरंकारी भक्तगणांकडून समर्पण दिवसानिमित्त बाबा हरदेवसिंहजी यांना श्रद्धा सुमने अर्पित समर्पण फक्त शब्दांपुरते सीमित न राहता ते प्रत्येक कृतीतून दिसावे

93

आशाताई बच्छाव

1001504894.jpg

निरंकारी भक्तगणांकडून समर्पण दिवसानिमित्त
बाबा हरदेवसिंहजी यांना श्रद्धा सुमने अर्पित
समर्पण फक्त शब्दांपुरते सीमित न राहता ते प्रत्येक कृतीतून दिसावे
सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज
जालना, दिलीप बोंडे ब्युरो चीफ : संत निरंकारी मिशनच्या वतीने समर्पण दिवसाचे औचित्य साधून युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या पुण्यस्मरणार्थ एक भावपूर्ण वर्चुअल संत समागम आयोजित करण्यात आला. सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज आणि निरंकारी राजपिता जी  यांच्या पावन उपस्थितीत 13 मे रोजी आयोजित केलेल्या या समागमात देशविदेशातून लाखो श्रद्धाळूंनी ऑनलाइन सहभाग घेतला.
समर्पण दिवसाच्या निमित्ताने  निरंकारी भवन गांधी चमन जुना , जालना येथे विशेष सत्संग समारोहाचे आयोजन करण्यात आले ज्यामध्ये शेकडो भाविक भक्तगणांनी भाग घेतला आणि बाबा हरदेवसिंहजी महाराज यांचे दिव्य जीवन व शिकवणूकीतून प्रेरणा प्राप्त केली.
या दिवशी सतगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांनी वर्चुअल सत्संगाद्वारे श्रद्धाळू भक्तगणांना संबोधित करताना सांगितले की सतगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज  यांचे जीवन क्षणोक्षणी प्रेम, त्याग, सेवा आणि दिव्य शिकवणूकींनी परिपूर्ण होते. असेच भक्तिभावाचे समर्पित जीवन आपलेही व्हावे, असे त्यांनी प्रतिपादन केले. समर्पण फक्त शब्दांत न राहता ते आचरणात उतरायला हवे.
सतगुरु मातांनी स्पष्ट केले की खरी श्रद्धा आणि प्रेम हे केवळ बोलण्यातून नाही, तर कृतीतून व्यक्त होतात. जर आपण बाबाजींची शिकवण फक्त सोशल मिडियापुरतीच मर्यादित ठेवत असू, तर ते खरे समर्पण नाही. खरे समर्पण तेव्हाच प्रकट होते जेव्हा आपण आत्मपरीक्षण करून पहावे, की आपण खरोखरच नम्रता, क्षमा आणि प्रेम यांचे पालन करत आहोत का? त्यांच्या जीवनातील प्रत्येक पैलू साध-संगतसाठी मार्गदर्शक होता. समर्पण दिवस ही केवळ एक तारीख नसून, ही एक संधी आहे.

Previous articleअशोकनगर मध्ये भगवान गौतम बुद्ध पौर्णिमा साजरी
Next articleमुक्रमाबाद येथील कर्तव्यदक्ष अधिकारी भालचंद्र तिडके साहेबांचं वाढदिवसानिमित्त अभिनंदनाचा वर्षाव
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.