राजेंद्र पाटील राऊत
खाद्यतेलाचे भाव कडाडल्याने सर्व सामान्यांचे कंबरडे मोडले ; वर्षभरात दर पोहचले दुप्पटीवर ___संग्राम. पाटील
संग्राम पाटील तांदळीकर
मुखेड तालुका शहर प्रतिनिधी
कोरोनाने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. लॉकाडाउनमुळे रोजगार गेले आहेत. बहुतेकांना कामधंद्यासाठी बाहेर पडता येत नाही. गेल्या वर्षभरापासून खाद्यतेलाचे दर वाढत आहेत. तेलाच्या किमतीत यंदा विक्रमी 80 ते 90 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सोयाबीन 160 रुपये प्रतिकिलो वर पोचले आहे. या दरवाढीचा फटका सर्वसामान्यांना बसला आहे.
तेलाच्या भावात वाढ झाल्याने बहुतांश ग्राहक सोयाबीन किंवा पामतेलाला पसंती देत आहेत. कोरोना संकटात खाद्यतेलासह इतर वस्तूंचे दर झपाट्याने वाढल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत.कोरोनामुळे वाढलेल्या आरोग्यावरील खर्च, इंधनाचे वाढते दर आवाक्याबाहेर जाणारे आहे. गॅस सिलेंडरचे दर यामुळे जगावं तरी नेमकं कसं हा प्रश्न सर्वसामान्य माणसाला पडत आहे. गेल्या वर्षीपासून एक तर कोरोना मुळे व्यवहार ठप्प राहिल्यामुळे सर्वांची आर्थिक घडी विस्कटली आहे. कोव्हिड या संकटाबरोबरच महागाईमुळे सर्वसामान्य जनता होरपळत आहे.
गेल्या वर्षी सोयाबीन तेलाची किंमत प्रति किलो 80 ते 90 रुपयांपर्यंत होती. मात्र सध्या हा दर 170 रुपयांवर पोचला आहे. तसेच वाढत्या दरात विक्रीसुद्धा सुरू आहे. सर्वसामान्य नागरिक इतर खाद्यतेलाच्या तुलनेत सोयाबीन तेलाचे दर कमी असल्याने त्यास पसंती देतात. मात्र आता सोयाबीन तेलाच्या दरात वाढ झाल्याने घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सध्या सर्वसामान्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. महागाईमुळे संसाराचा गाडा चालवणे कठीण झाले आहे. व सर्व सामान्य व्यक्तीचे वाढत्या महागाईमुळे कंबरडे खचले आहे