Home माझं गाव माझं गा-हाणं _डांगसौंदाणे नगरीचे प्रसिद्ध मसाला व्यापारी दिगंबर महादु भदाणे(भाऊ मसलेवाले ) यांचे वतीने...

_डांगसौंदाणे नगरीचे प्रसिद्ध मसाला व्यापारी दिगंबर महादु भदाणे(भाऊ मसलेवाले ) यांचे वतीने डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयातील (कोव्हिडं केअर सेंटर) मधील रुग्ण व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी 1200 पाणी बॉटल(100 बॉक्स) चे वाटप_….                             

150
0

राजेंद्र पाटील राऊत

 

_डांगसौंदाणे नगरीचे प्रसिद्ध मसाला व्यापारी दिगंबर महादु भदाणे(भाऊ मसलेवाले ) यांचे वतीने डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयातील (कोव्हिडं केअर सेंटर) मधील रुग्ण व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी 1200 पाणी बॉटल(100 बॉक्स) चे वाटप_….                                                  सटाणा,( जगदिश बधान तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

डांगसौंदाणे येथील प्रतिष्ठित व्यापारी दिगंबर महादू भदाणे यांनी आपल्या दातृत्वातुन आज डांगसौंदाने ग्रामीण रुग्णालयातील रुग्णासाठी व तेथे आरोग्य सेवा देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी शंभर पाणी बॉक्स देऊन आपले दातृत्व सिद्ध केले आहे आज सकाळी दहा वाजेच्या दरम्यान मी स्वता मसाला घेण्यासाठी भाऊ यांच्याकडे गेलो असता भाऊंनी रुग्णालयासाठी आणि तेथे उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी पाणी बॉक्स देण्याची इच्छा व्यक्त केली मी तात्काळ रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जगदीश चौरे यांना याबाबत कल्पना देऊन सदर पाणी बॉक्स तात्काळ आपल्या रुग्णालयात येत असल्याची माहिती दिली गावातील तरुण व्यापारी स्वप्निल चिंचोरे यांनी तात्काळ रुग्णालयात 100 बॉक्स पोहच केले रुग्णालय प्रशासनाला भाऊ यांचे लहान चिरंजीव किरण भदाणे यांनी या पाणी बॉक्स चे वाटप करून या हि पुढे रुग्णालयाला पाण्याची आवश्यकता भासल्यास मदत्त करण्याचा शब्द दिला रुग्णालय प्रशासनने भदाणे कुटुंबियांचे आभार मानले व गावातील दानशूर व्यक्ती किंवा संघटनांनी मदत केली तरी रुग्णांना आधार मिळतो असे डॉ चौरे यांनी सांगितले रुग्णालय प्रशासन आरोग्य कर्मचारी सतत रुग्णांची काळजी घेत असुन जास्तीत जास्त रुग्णांना आहार व औषधे वेळेवर कसे देता येतील यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी मेहनत घेत असल्याचे डॉ चौरे यांनी सांगितले या वेळी जेष्ठ पत्रकार हेमंतदादा चंद्रात्रे, पत्रकार निलेश गौतम, किरण भदाणे, रुग्णालयातील आरोग्य स्टाफच्या बोरसे मॅडम, लैब टेक्निशीयन हर्षद सोनवणे, संतोष दुसाने स्वप्नील चिंचोरे विशाल नेरकर आदी उपस्थित होते.

धन्यवाद ….
भाऊ मसालेवाले….

Previous articleआरक्षण संकल्पना छ.शाहू महाराजांनी मांडली त्यांच्याच राज्यात मराठ्यांना आरक्षण मिळत नाही
Next articleपश्चिम बंगाल मधील रक्तरंजित हिंसेचा सटाण्यात निषेध           
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here