Home नांदेड अंबुलगा येथील पाच शेतकऱ्यांना लावली हळद,एकरी दिड ते दोन लाख रूपयाचा होणार...

अंबुलगा येथील पाच शेतकऱ्यांना लावली हळद,एकरी दिड ते दोन लाख रूपयाचा होणार नफा बाजार भावामुळे शेतकऱ्यांची होणार चांदी

99
0

राजेंद्र पाटील राऊत

अंबुलगा येथील पाच शेतकऱ्यांना लावली हळद,एकरी दिड ते दोन लाख रूपयाचा होणार नफा

बाजार भावामुळे शेतकऱ्यांची होणार चांदी

मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार.(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

मुखेड तालुका म्हटल की डोंगराळ खडकाळ तसेच दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाते.यंदा अतिवृष्टी होऊन अनेक शेतकऱ्यांचे मुग, उडिद, सोयाबिन,कापूस,तूर या पिकांचे मोठे नुकसान झाले.मात्र याच तालुक्यातील अंबुलगा गावातील मष्णाजी चल्लावाड , हाणमंत मंत्रे , प्रल्हाद येवते, तुकाराम कंल्याणपाड , गंगाधर पोगुलवाड या पाच भागायतदार शेतकऱ्यांनी बोर , विहीरीतील पाण्याच्या जोरावर ठिंबक सिंचन करून आपआपल्या शेतात हळद पिकाची लागवड केली होती.हि लागवड करत असताना एका शेतकऱ्याला ठिबंक सिंचन , बेन, लागवड करण्यासाठी एकरी ३५ हजार रूपये खर्च करावे लागले होते.

त्यानंतर अवघ्या नऊ महिण्यातच या शेतकऱ्यांची हळद काढणीला आणि कोणाला एकरी २६ क्विंटल तर कोणाला ३० तर कोणला ३२ क्विंटल अशा पद्धतीने हळदिचे उत्पन्न झाले.आणि हळद काढणी व शिजवणी साठी ३५ हजार रूपये खर्च आले.एकूण शेतकऱ्यांना ७० हजार रूपये खर्च आले.अतिवृष्टीने तर सगळ्याच पिकांचे नुकासान झाले.मात्र हळदीचे पिक या शेतकऱ्यांच्या हाताला लागल्याने या शेतकऱ्यांचा चेहऱ्यावर आनंद दिसुन येत होते. यंदा बाजारात हळदिला चांगला भाव असल्याने या शेतकऱ्यांच्या अंगाला मात्र हळद चांगलीच लागली. त्यामुळे एकरी एका शेतकऱ्याला दिड ते दोन लाख रूपयाचे नफा होणार असल्याने.या शेतकऱ्यांची चांदीच झाली. या शेतकऱ्यांने शोधलेल्या नफा कमवण्याच्या या भन्नाट सुत्राने ग्रामीण भागातील असंख्ये शेतकऱ्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

 

▪️बागायती पिकामध्ये हळद पिकाचा समावेश केल्यास शेतकऱ्यांसाठी आर्थिक दृष्ट्या उपयोगी ठरेल.त्यामुळे भागायतदार शेतकऱ्यांनी पर्यायी पिक म्हणून हळद , उस , आद्रक , बटाटा या पिकांचा समावेश करावा.

– शेतकरी वैभव पदमाकर चल्लावाड

▪️हळदीच्या पिकात आंतरपीक म्हणून मिरची, तुर ,एरंडा , झेंडू , या पिकाचा समावेश करता येतो.या पिकाचा जर शेतकऱ्यांनी समावेश केल्यास शेतकऱ्यांना अजून दुप्पट नफा होऊ शकतो.त्यामुळे हळद उत्पादन हे भागायतदार शेतकऱ्यांन साठी फायदेशीर आहे.

– पवन जगडमवार अंबुलगा बु )

 

▪️गावातील हळद उत्पादक शेतकऱ्यांनी शेतात नाविन्यपूर्ण प्रयोग करून हेक्टरी आधिक उत्पादन मिळविले. त्यात कृषी विद्यापीठाच्या बायोमिक्स सारख्या जैविक औषधांचा वापर, ठिबक सिंचनाचा वापर आणि कृषी विभाग व आत्मा कडून वेळोवेळी मिळणारे मार्गदर्शन याचा शेतकर्यांना फायदा झाला. यांच्या अनुभवाचा फायदा नवीन हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी घ्यावा व आपले उत्पन्न वाढवावे.

– श्री. एच. एस. टोकले
कृषी सहाय्यक अंबुलगा
कृषी कार्यालय मुखेड

Previous articleमाजी आ. हणमंतराव पाटिल बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नाना यश. गरजू रुग्णांसाठी शासकिय उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दहा बेडचे अतिदक्षता विभागाची सुरुवात
Next articleवल्लभ हाँस्पीटलच्या आयसीयु विभागात लागली आग 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here