Home नांदेड माजी आ. हणमंतराव पाटिल बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नाना यश. गरजू रुग्णांसाठी शासकिय उपजिल्हा...

माजी आ. हणमंतराव पाटिल बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नाना यश. गरजू रुग्णांसाठी शासकिय उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दहा बेडचे अतिदक्षता विभागाची सुरुवात

106
0

राजेंद्र पाटील राऊत

माजी आ. हणमंतराव पाटिल बेटमोगरेकर यांच्या प्रयत्नाना यश. गरजू रुग्णांसाठी शासकिय उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे दहा बेडचे अतिदक्षता विभागाची सुरुवात.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथे माजी आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर यांनी पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण साहेबांकडे मूखेड उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटरला कोरोना रुग्णांची वाढती संख्या पहाता जादा बेड तसेच आॅक्सीजन बेड आयसियू बेडची मागणी केली होती.
मा.चव्हाणसाहेबांनी तातडीने लक्ष देण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांना आदेश दीला होता.त्याप्रमाणे जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ.नीळकंठ भोसिकर यांनी ही लक्ष देवून तातडीने दहा बेडचे आय सी यू कक्ष स्थापन करुन रुग्णांना ऊपचार होतील याची व्यवस्था प्रदान केली.मा.हणमंतराव पाटील जेंव्हा जेंव्हा लक्ष घालतात तो प्रश्न तडीस नेतात ही त्यांची खासीयत आहे.यापुढे ही रुग्णालयाच्या बाबतीत कांहिही अडचण आल्यास ते लक्ष घालणार आहेत.
मुखेड रुग्णालयाचा पॅरामेडीकल स्टाफ सध्या तरी समाधान कारक सेवा देत आहेत.त्यांच्यावर ताण पडत आहे तरीही आणखी स्टाफ वाढवावा लागेल असे वाटते.
तसेच सिटी स्कॅन चालु करण्यासाठी मा.बेटमोगरेकर साहेबांनीच लक्ष द्यावे लागेल त्याशिवाय ती मागणी कांही पुर्ण होणार नाही.तसे जि.प.अध्यक्षा मा.मंगाराणी अंबूलगेकरांनी ही त्यासाठी प्रयत्न करावेत.असे जनतेला वाटते.
मुखेड ऊपजिल्हा रुग्णालयातील सोयीसूविधा वाढविण्यासाठी मा.आ.हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,व माजी जि.प.अध्यक्ष मा.दीलीपराव पाटील बेटमोगरेकर यांचे वीषेश प्रयत्न कामी येत आहेत.मुखेडवासीयांच्या वतीने त्यांचे शतशः धन्यवाद.!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here