Home माझं गाव माझं गा-हाणं सुरगाणा तालुक्यातील सराड गावात भीषण पाणी टंचाई, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गावातील तरुण...

सुरगाणा तालुक्यातील सराड गावात भीषण पाणी टंचाई, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गावातील तरुण युवकांनी केलं श्रमदान

107
0

राजेंद्र पाटील राऊत

सुरगाणा तालुक्यातील सराड गावात भीषण पाणी टंचाई, पाणी प्रश्न सोडवण्यासाठी गावातील तरुण युवकांनी केलं श्रमदान. (युवा मराठा न्युज तालुका प्रतिनिधी -पांडुरंग गायकवाड )
सुरगाणा तालुक्यात पावसाळ्यामध्ये सरासरी १००% पेक्षा जास्त पर्जन्यवृष्टी ही होत असते, परंतु उन्हाळ्याची चाहूल लागताच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उभा ठाकतो, या तालुक्यातील जनता पाण्याच्या शोधात वनवन करत फिरत असते.
सुरगाणा तालुक्यातील सराड या गावात भीषण पाणी टंचाई जाणवू लागल्याने गावातील महिला, पुरुष, लहान मुलांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी एक ते दीड किलोमीटर अंतरावर पायपीट करावी लागते. गावातील जलस्वराज्य प्रकल्प हा फक्त काही महिन्यापर्यंत मर्यादित असतो.गेले आठ दिवस नळाला पाणी आलं नाही महिला पाणी टंचाईने त्रस्त झाल्या आहेत. गावातील पाण्याची तहान भागवण्यासाठी तरुण व जेष्ठ गावकऱ्यांनी मिळून गावची जुन्या विहिरीतील गाळ उपसून श्रमदान केले, यावेळी वसंत भोये, दौलत भोये, लक्षुमन गायकवाड चंदू भोये, यशवंत भोये, हरी भोये व गावातील तरुण श्रमदानासाठी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here