राजेंद्र पाटील राऊत
रूग्ण संख्येनुसार बेड वाढलेच पाहिजेत, 24 तासांत रिपोर्ट यायलाच हवा.
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.
आरोग्यमंत्री राजेश टोपे
महत्वाचं बेड मॅनेजमेंट मी ज्याला म्हणेल, रूग्णसंख्येचा जिल्ह्याचा ग्रोथ रेट काय आहे, त्या गतीनुसार बेड्स देखील वाढलेच पाहिजे.
बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही. वैद्यकीय सुविधा किंवा आरोग्य सुविधा वाढवल्या गेल्या पाहिजे.
जिथं आवश्यकता असेल तिथं ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवले गेले पाहिजेत. रूग्णालयात जागा नसेल तर एखाद्या संस्थेत वाढावा, कुठंही वाढवा पण बेड्स नाहीत अशी परिस्थिती होता कामा नये.
खाजगी रूग्णलयात देखील जे रूग्णालय असतील आपण 80 टक्के बेड्स ताब्यात घेतलेच पाहिजे, असा देखील इशारा सर्वांना देण्यात आलेला आहे.
केंद्र शासनाने सांगितल्याप्रमाणे ट्रॅकिंग, ट्रेसिंगचं प्रमाण असायलाच हवं, हे देखील आम्ही कटाक्षाने सांगितलं आहे.
24 तासात तपासणीचा रिपोर्ट आलाच पाहिजे. संस्थात्मक विलगीकरणावर भर दिला गेला पाहिजे, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे, अशी माहिती यावेळी आरोग्यमंत्री टोपेंनी सांगितली.