Home पश्चिम महाराष्ट्र सोलापूर शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. विविध प्रसारमाध्यमांमध्ये पत्रकारिता करत असलेल्या...

सोलापूर शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली. विविध प्रसारमाध्यमांमध्ये पत्रकारिता करत असलेल्या एका युवकाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.

86
0

राजेंद्र पाटील राऊत

सोलापूर शहरात आज एक हृदयद्रावक घटना घडली.
विविध प्रसारमाध्यमांमध्ये पत्रकारिता करत असलेल्या एका युवकाने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली.   (महादेव घोलप जिल्हाप्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
प्रकाश धर्मा जाधव (वय 35, रा. सुशीलनगर, जुळे सोलापूर) असे या पत्रकाराचे नाव असून दोनच दिवसापूर्वी त्याच्या वडिलांचा कोरोनाने बळी घेतला होता.तर, आई आणि सख्खा भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळल्यानंतर प्रकाश खचला होता.
पोलिस खात्यात असलेला भाऊ व आईसाठी लागणाऱ्या रेमेडीसिव्हीर इंजेक्‍शनसाठी त्याची ससेहोलपट होत होती. सलग तीन ते चार दिवस रेमेडीसिव्हर इंजेक्शन मिळू शकले नाही. यामुळे मानसिक दृष्ट्या खचलेल्या  पत्रकार प्रकाश जाधव याने नैराश्यपोटी आपल्या हाताची नस कापून जीवनयात्रा संपविली.
संगमेश्वर कॉलेजमध्ये पत्रकारिता व जनसंवाद विभागात तो प्रथम आलेला होता. शहरातील विविध प्रसार माध्यमांमध्ये त्याची होतकरू पत्रकार म्हणून ओळख निर्माण झाली होती. नैराश्‍येच्या भावनेतून त्याने आत्महत्या केली असावी, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
प्रकाश यांच्या वडिलांचा मृत्यू झाला होता. आई आणि पोलिस खात्यात असणारा भाऊ अशा दोघांनाही कोरोनाची लागण झालेली होती. त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. आईला उपचारासाठी रेमेडेसिव्हीर इंजेक्‍शन लागणार होते. त्यासाठी तो दिवस-रात्र फेऱ्या मारत होता. आई,भाऊ कोरोना पॉझिटिव्ह असल्याने  प्रकाश होम क्वारंटाइनमध्ये होता. त्याने आपल्या हाताची नस कापून जीवनयात्रा संपवली. या प्रकाराने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
यामुळे सोलापूर शहरातील आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Previous articleरूग्ण संख्येनुसार बेड वाढलेच पाहिजेत, 24 तासांत रिपोर्ट यायलाच हवा. 
Next articleधक्कादायक” देगलूर येथील अपहरण झालेला मुलगा गंभीर जख्मी अवस्थेत सापडला
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here