Home सामाजिक संवेदनशीलता

संवेदनशीलता

315
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_073821.jpg

संवेदनशीलता

आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस जगतो की फक्त धावतो आहे हा खरंतर विचार करण्यासारखा विषय आहे.माणसाला माणुसकीने जगण्याची, भूतदया,संवेदना जागविण्याची नितांत गरज आहे.धावपळीच्या जगात माणुसकी क्षीण होत चालली आहे.जो-तो आपल्याच विश्वात गुरफटलेला आहे.एकमेकांवरील राग, द्वेष,संशय या भावना आजच्या जगात जास्तच बळावल्या आहेत.त्यामुळे अनेक गुन्हे घडताना आपण समाजात पाहत असतो.लहानसहान गोष्टींतून वाद निर्माण होऊन त्याची परिणती खून, मारामारी अशा हिन पातळीच्या गुन्ह्यात होते.अशा घटना घडल्या की लोकांची संवेदनशीलता कमी झाली की काय असे वाटते.अशा घटना घडल्या की लोक काही दिवस त्याची चर्चा करतात.काही दिवसांनी झाले गेले सर्व विसरून आपापल्या कामाला लागतात.
माणसात अनेक प्रकारच्या भावना असतात.संवेदनशीलता म्हणजे एखाद्या वस्तू, घटना किंवा व्यक्तीविषयी भावनात्मक प्रतिक्रिया.संवेदना व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत.पूर्वी आपण पत्राद्वारे नातेवाईक,मित्रांची खबरबात घेत होतो.पत्रात आपण आपल्या भावना लिहून पाठवत होतो.आज काळ बदललाय.आज आधुनिक तंत्रज्ञानामुळे आपण आपल्या भावना एका क्लिकवर समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहचवू शकतो.संवेदनशीलता ज्यात आहे त्याला आपण चांगला माणूस म्हणतो.समोरच्या व्यक्तीचे दु:ख जाणून त्याला शाब्दिक, आर्थिक किंवा मानसिक आधार देत त्याचे दु:ख थोडे हलके करणे यालाच संवेदनशीलता म्हणतात.हे करत असताना त्या व्यक्तीकडून कुठलीही अपेक्षा करता कामा नये.जर आपल्या अंगी संवेदनशीलता नसेल तर आपण नक्कीच माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचे नाही.संवेदनशीलता म्हणजे मनाचा चांगुलपणा.समोरच्याचा आदर करणेही संवेदनशीलता आहे.व्यक्तीच्या भावनांचा आदर करून त्याच्याशी सहानुभूतीने वागणे म्हणजेही संवेदनशीलता होय.संवेदनशील असणं जरी चांगलं असलं तरी कधीकधी त्याचा त्रासही होतो.काही लोक वाईट प्रवृत्तीचे असतात.अशा लोकांविषयी संवेदनशीलता दाखवली तर ते आपला गैरफायदा घेण्याची दाट शक्यता असते.खरं बघता संवेदनशील व्यक्ती नेहमी दुसऱ्यांबद्दल चांगला विचार करते.दुस-यांचं भलं व्हावं असा विचार ती व्यक्ती करत असते.परंतु हल्ली स्वतः बद्दलच विचार करणारी मंडळी आपल्या आजूबाजूला असतात.दुस-यांच्या दु:खाबद्दल त्यांना कुठलीच हळहळ वाटत नाही.संवेदनशीलता माणूस असण्याचे एक प्रमाण आहे.समाजात अनेक लोक आपल्या संवेदनशीलतेतून लोकांसाठी सतत झटत असतात.लोकांच्या भल्यासाठी चांगलं काम करत असतात.
फक्त माणूसच संवेदनशील असतो असे अजिबात नाही.मुकी जनावरे यांचाही यात समावेश होतो.संवेदनशील असताना माणसाने सजगही असायला हवे.संवेदनशीलतेचा अभाव असणारी व्यक्ती पाषाण हृदयी असते असे म्हटले तरी चालेल.थोडक्यात माणुसकी जपणे म्हणजे संवेदनशीलता.अनेक लोक असे असतात ज्यांच्या चेहऱ्यावर एक आणि मनात एक असे दोन भाव असतात.संवेदनशीलता नसलेला माणूस संजीव असूनही निर्जीव आहे.ज्या माणसाच्या भावना बोथट झालेल्या असतात त्याला माणूस कसे म्हणायचे?अशा माणसांना कुठलाही वाईट प्रसंग घडला तरी त्याचे काहीच वाटेनासे होते.संवेदनशीलता एका माणसाला दुसऱ्या माणसाशी जोडत असते.ज्यांच्याशी आपला काही संबंध नसतो अशा परक्या माणसांविषयी पण आपल्या मनात त्यांच्या वाईट प्रसंगी संवेदनशीलता निर्माण होते.पण जेव्हा स्वार्थ मनात घर करतो तेव्हा हीच भावना नष्ट होते.हल्ली जो-तो पैश्याच्या मागे धावतो आहे.त्यामुळे शांती,सुख या जीवनातील महत्त्वाच्या गोष्टी कमी झाल्या आहेत.जीवन फक्त स्वतःच्या सुखासाठी नाही तर काही प्रमाणात दुस-यांसाठीही असावे.संवेदनशीलता आपल्या जीवनात एक महत्त्वाची भूमिका बजावते.चला तर आपणही आपल्या संवेदना जागृत ठेवूया!

लैलेशा भुरे
नागपूर

Previous articleनुतन प्राथमिक विद्या मंदिर शाळेत स्नेहसंमेलनल साजरे
Next articleशिव आहेत म्हणून आपण आहोत-साक्षीताई मुळे आज पद्मीनीताई खराडे कीर्तन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here