Home जालना शिव आहेत म्हणून आपण आहोत-साक्षीताई मुळे आज पद्मीनीताई खराडे कीर्तन

शिव आहेत म्हणून आपण आहोत-साक्षीताई मुळे आज पद्मीनीताई खराडे कीर्तन

20
0

आशाताई बच्छाव

IMG_20240218_074227.jpg

शिव आहेत म्हणून आपण आहोत-साक्षीताई मुळे
आज पद्मीनीताई खराडे कीर्तन
जालना,(दिलीप बोंडे ब्युरो चीफ): अंबड रोडवरील उड्डाणपुलानजीक असलेल्या श्री संत शिरोमणी मन्मथ स्वामी मंदिरात अखंड शिवनाम सप्ताहात आज रविवारी रात्री शिभप पद्मीनीताई खराडे (लातूर) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची माहिती समितीचे अध्यक्ष बंडुअप्पा परदेशी यांनी दिली. दरम्यान, काल रात्री साक्षीताई मुळे यांचे शिव कीर्तन झाले. त्यांनी आपल्या किर्तनातून समाजातील अंधश्रध्दा, रुढी परंपरांवर ताशेरे ओढतांनाच शिव आहेत म्हणून आपण असल्याचे सांगितले.
कै. दिलीपअप्पा खाकरे यांच्या प्रेरणेने सुरु असलेल्या या सप्ताहात दररोज धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला  मिळत आहे. तर परमरहस्य पारायण व्यासपीठाचे प्रमुख शिभप रमेश महाराज लोणगावकर (राजूर) हे करत आहेत. यानिमित्त सकाळी 5 ते 6 यावेळेत काकडा, 6 ते 7 शिवपाठ, 7 ते 8 दरम्यान रुद्राभिषेक, 9 ते 11 या वेळेत ग्रंथराज परमरहस्य पारायण आणि 11.30 ते 1. 30 यावेळेत ॐ नम: शिवाय जप त्यानंतर आरती तर सायंकाळी 4 ते 5 यावेळेत परमरहस्यावरील प्रवचन आणि 5 ते 7 शिवपाठ तर रात्री 8.30 ते 10.30 या दरम्यान शिवकीर्तन होत आहे.
काल शुक्रवारी शिभप साक्षीताई मुळे (जालना) यांचे कीर्तन पार पडले. त्यांनी आपल्या कीर्तनातून समाजातील रुढी- परंपरांवर आघात केले. आता उद्या रविवार दि. 18 शिभप श्री. पद्मीनीताई खराडे, सोमवार दि. 19 रोजी ष.ब्र.108 शिवचैतन्य शिवाचार्य महाराज, मंगळवार दि. 20 फेब्रुवारी रोजी ष. ब्र. 108 विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे किर्तन होणार आहे. तर दि. 21 रोजी सकाळी 8 ते 10 या वेळेत प्रसादाचे किर्तन ष.ब्र.108, सिध्दचैतन्य शिवाचार्य महराज साखरखेर्डा यांचे किर्तन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा पंचक्रोशितील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष बंडुअप्पा परदेशी, दिगंबरअप्पा लाटकर

Previous articleसंवेदनशीलता
Next articleअंबड तालुक्यात गाव चलो अभियानाचा प्रारंभ  केंद्र सरकारच्या योजनाची घरोघरी जाऊन जनजागृती
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here