Home जालना जालना शहरातील अनेक विभागात मागील १५ ते २० दिवसापासून पाणी नाही, मनपा...

जालना शहरातील अनेक विभागात मागील १५ ते २० दिवसापासून पाणी नाही, मनपा प्रशासन झोपा काढतं काय जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरांचा संतप्त सवाल

88

आशाताई बच्छाव

IMG_20240128_075546.jpg

जालना शहरातील अनेक विभागात मागील १५ ते २० दिवसापासून
पाणी नाही, मनपा प्रशासन झोपा काढतं काय
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरांचा संतप्त सवाल
जालना,दि. २७(प्रतिनिधी दिलीप बोंडे)-जालना शहरातील अनेक विभागात मागील १५ ते २०
दिवसापासून पाणी नाही, मनपा प्रशासन झोपा काढतं काय, असा संतप्त सवाल
जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकर यांनी महापालिकेला केला.
शहरातील गांधीनगर व ढोरपुरा भागातील काही नागरिकांनी जिल्हाप्रमुख तथा
माजी नगराध्यक्ष भास्करराव अंबेकर यांना फोन करून पाण्यामुळे होणारे हाल
कानावर टाकले. शहरातील अनेक विभागांमध्ये मागील १५ ते २० दिवसापासून
महानगर पालिकेने पाणीपुरवठा केला नाही. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे
पाण्याअभावी प्रचंड हाल होत आहेत. अद्याप उन्हाळाही लागलेला
नाही.जायकवाडी योजनेतूनही मोठा पाणीपुरवठा होतो पण केवळ महानगर
पालिकेच्या ढिसाळ व नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांना तीव्र
पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. आज यावर कोणी बोलायला तयार नाही.
एकीकडे ८०० रुपये असणारी पाणीपट्टी पालिकेने २८०० रुपये केली पण दुसरीकडे
नागरीकांना पाणीपुरवठा मात्र अनियमितच व दुषित केला जात आहे. त्यामुळे
नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आज शहरातील गांधीनगर व ढोरपुरा
भागातील काही नागरिकांनी जिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष भास्करराव
अंबेकर यांना फोन करून पाण्यामुळे होणारे हाल कानावर टाकले. माहिती
मिळताच जिल्हाप्रमुख अंबेकर यांनी तात्काळ त्या भागात धाव घेऊन
सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. तसेच पालिकेचे अभियंता व
लाईनमेन यांना बोलवून हा प्रश्न का निर्माण झाला? पाणी कधी सोडणार? अशी
विचारणा केली. १५ ते २० दिवस पाणी सोडले नाही, मग तुम्ही झोपा काढता काय?
असा संतप्त सवाल ही जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरांनी यावेळी केला .

Previous articleशिवनेरी चौक व जय नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण
Next articleचित्रकार प्रदीप भाऊसाहेब शिंदे यांना कला गौरव पुरस्कार प्रदान
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.