Home अमरावती शिवनेरी चौक व जय नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा शिवसेना जिल्हा प्रमुख...

शिवनेरी चौक व जय नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण

25
0

आशाताई बच्छाव

IMG_20240128_075219.jpg

शिवनेरी चौक व जय नगर येथे प्रजासत्ताक दिन साजरा
शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण
————–
दैनिक युवा मराठा
पी एन देशमुख
अमरावती जिल्हा विभागीय संपादक.
अमरावती.
अमरावती गोपाल नगर स्थित शिवनेरी चौक व जयनगर येथे 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
शिवनेरी चौक येथील कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, मधुकरराव अभ्यंकर, आप्पा पाटिल, दंदे गुरुजी, गजानन गूजरे, संजय गव्हाळे, प्रमोद भारस्कार ,गणेश तायवाडे,. मनोज भुतडा, किशोर यादव, तुकाराम कडु, रवींद्र सोमवंशी, बंडू शेटे, सोनू सोनवणे, बंटी घोळकर, आशिष बरवट,उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन संजय शेटे यांनी केले होते. सोबतच परिसरातील राजीव गांधी विद्यालयामध्ये संस्था अध्यक्ष मधुकरराव अभ्यंकर यांच्या उपस्थितीत सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी
गोपाल अभ्यंकर सर, राठोड सर, चौधरी सर, भगत सर, सुनील अडसोड, दंदे सर,शाम पाटिल, घनशाम आखरें, सचिन गव्हारे, बहाळे, दिगंबर गव्हाळे, धनराज इंगळे , हेमंत पत्रे, बबन कोल्हे. रवींद्र कदम विठ्ठल गाठे, व राजीव गांधी विद्यालयाचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते . जयनगर येथे आयोजित प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सुनील खराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .या प्रसंगी माजी नगरसेवक डॉक्टर राजेंद्र तायडे ,डॉक्टर रुपेश खडसे ,मंगेश खोंडे,अनिल मानकर आदी उपस्थित होते.

Previous articleदेगलुर मधे प्रजासत्ताक दिन हर्षोल्हासात साजरा..
Next articleजालना शहरातील अनेक विभागात मागील १५ ते २० दिवसापासून पाणी नाही, मनपा प्रशासन झोपा काढतं काय जिल्हाप्रमुख भास्करराव अंबेकरांचा संतप्त सवाल
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here