Home वाशिम जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले. जिल्हाधकाऱ्यांच्या...

जंगलाला लागलेली आग विझवण्यासाठी जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले. जिल्हाधकाऱ्यांच्या हस्ते सत्कार.

14
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220405-WA0014.jpg

वाशिम,(गोपाल तिवारी ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)-                                                                                            दि. २ एप्रिल २०२२ रोजी मानोरा जि. वाशिम येथे प्रादेशिक जंगलाला लागलेली आग विझविण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संलग्नित श्रीमती. साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वनोजा रासेयो आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक ने स्वत:च्या जीवाची पर्वा न करता आगीवर नियंत्रण मिळवले याचा सन्मान म्हणून आज वाशिम जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हाधिकारी मा. शण्मुगराजन एस. सर यांच्या हस्ते पथकाच्या सदस्य ओम वानखडे, प्रविण गावंडे, नयन राठोड, सचिन राठोड, व इतरसदस्याचा शाॅल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी आदरणीय मा. शैलेश हिंगे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मा. शाहु भगत, महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. देवेंद्र गावंडे, समन्वयक प्रा.बापुराव डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी सरांनी सर्व रासेयो स्वयंसेवकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

Previous articleस्वानंद सेवा सदन चे भूमिपूजन अर्नाळा येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते संपन्न.
Next articleओबीसी,दलित,आदिवासी, शेतकरी, महिला ना न्याय देण्यात महाविकास आघाडी सरकार अपयशी। देवेंद्रजी फडणवीस,मा.मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here