Home कोल्हापूर बदलीच्या नाराजीमूळे पोलिस अधिकाऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

बदलीच्या नाराजीमूळे पोलिस अधिकाऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

91
0

राजेंद्र पाटील राऊत

बदलीच्या नाराजीमूळे पोलिस अधिकाऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

पेठ वडगांव: कोल्हापुरात पोलीस निरीक्षकांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.
पो.नि.प्रदीप काळे यांनी वारणा नदीत उडी घेऊन आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने त्यांचा जीव वाचवण्यात यश आले आहे. त्यांची उजळाईवाडी विमानतळावर तडकाफाडकी बदली झाल्यामुळे काळे नाराज असल्याची चर्चा चालू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगांव पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून प्रदीप काळे याआधी कार्यरत होते. मात्र काही दिवसांपूर्वी काळेंची बदली करण्यात आली होती.
बदलीच्या कारणास्तव प्रदीप काळे नाराज असल्याची चर्चा होत होती . आत्महत्येचा प्रयत्न करण्याआधी सोशल मीडियावर त्यांनी पोस्ट टाकून आभार मानले होते.
“ज्या पोलिस ठाण्यावर सन २०१४ मध्ये पब्लिकने दगडफेक केली होती, त्याच पोलिस ठाण्यास एक अपवाद वगळता कोणीही प्रभारी अधिकारी सात-आठ महिने टिकू शकला नाही, त्या पोलीस ठाण्याला अखंडित २७ महिन्याची चांगली सेवा बजावल्यानंतर दगडफेकीचे घाव झेललेल्या पोलीस ठाण्याच्याच ठिकाणी त्याच शहराच्या नागरिकांनी, नगराध्यक्षांनी, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार आणि माझा स्टाफ यांनी माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर फुलांचा वर्षाव करुन निरोप दिला, तो अभिमानास्पद एक क्षण”
“या यशाचे खरे हकदार माझे तत्कालीन अधिक्षक अभिनव देशमुख सर, उपअधिक्षक घाडगे सर, डीवायएसपी पिंगळे सर आणि काळे सर हे आहेत. त्यांच्या खंबीर आणि योग्य पाठबळामुळेच वडगांव पोलीस ठाणे, नागरिकांकडच्या उत्स्फूर्त सन्मानास पात्र ठरले आहे” अशी पोस्ट त्यांनी फेसबुकवर काही तासा पुर्वीच टाकली होती.  (मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क कोल्हापूर )

Previous articleभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब १३०वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे साजरी..
Next articleपालघरमध्ये डाँ.बाबासाहेब आंबेडकर  जयंतीनिमित पुरस्कार वितरण               
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here