Home नांदेड भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब १३०वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.)...

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब १३०वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे साजरी..

143
0

राजेंद्र पाटील राऊत

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथे साजरी..
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
आज ग्रामपंचायत कार्यालय उंद्री प.दे. येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महापुरुष, विश्वरत्न, विश्वभुषण, महाविद्वान, महानायक, महान इतिहासकार, भारतीय संविधानाचे जनक, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधिसत्व, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती कोरोना (covid-19) च्या महामारी च्या संकटामुळे एकदम साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली .सर्वप्रथम ग्रामपंचायत कार्यालय उंद्री (प.दे.) येथील सरपंच श्रीमती वनिता रमेश गनलेवार यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले . शासनाने सांगितलेल्या त्रिसूत्री नियमांचे पालन करून महामानवास विनम्र अभिवादन करण्यात आले. महामानवाच्या क्रांतीकारी विचारांना विनम्र अभिवादन. त्रिवार कोटी कोटी प्रणाम.यावेळी सुधाकर गनलेवार, शिवाजी पंदनवाड, संदीप सोनकांबळे, राजेश सोनकांबळे, ग्रामपंचायत सदस्य राजू वाघमारे,दयानंद सोनकांबळे, उमेश सोनकांबळे , विजय अण्णा खानापूरकर, ग्रामपंचायत सदस्य शंकर गुरुजी पंदनवाड, नियाज अहमद शेख, मुकिंदा सोनकांबळे आदी व गावातील प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित होते.

Previous articleब्रेकिंग: सीबीएसई बोर्डाची 10वी ची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली
Next articleबदलीच्या नाराजीमूळे पोलिस अधिकाऱ्याची नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here