Home युवा मराठा विशेष ब्रेकिंग: सीबीएसई बोर्डाची 10वी ची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली

ब्रेकिंग: सीबीएसई बोर्डाची 10वी ची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली

267

राजेंद्र पाटील राऊत

📝 ब्रेकिंग: सीबीएसई बोर्डाची 10वी ची परीक्षा रद्द, 12 वीची परीक्षा पुढे ढकलली
युवा मराठा न्यूज नेटवर्क सोलापूर जिल्हा प्रतिनिधी महादेव घोलप.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सीबीएसई बोर्ड परीक्षांच्या संदर्भात 12 वाजता बैठक घेतली. या बैठकीला केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, सीबीएसईचे सचिव आणि महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये सीबीएसईच्या 10वी च्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर 12वी च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

10 वी चा निकाल सीबीएसई बोर्डाकडून वस्तूनिष्ठ पद्धतीनं तयार करण्यात आलेल्या मानाकांच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे.

📋 12वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. परीक्षा घेण्यासंदर्भात 1 जूनला परिस्थितीची पाहणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं दिली आहे.