Home मराठवाडा पालम तालुक्यामधील महावितरण महामंडळाच्या अजब कारभाराची गजब कहानी मिटर रिडींग मध्ये वेगळा...

पालम तालुक्यामधील महावितरण महामंडळाच्या अजब कारभाराची गजब कहानी मिटर रिडींग मध्ये वेगळा आकडा रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेगळा आकडा याची वरिष्ठांनी घ्यावी दखल.

185
0

राजेंद्र पाटील राऊत

पालम तालुक्यामधील महावितरण महामंडळाच्या अजब कारभाराची गजब कहानी मिटर रिडींग मध्ये वेगळा आकडा रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेगळा आकडा याची वरिष्ठांनी घ्यावी दखल.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

पालम महावितरण महामंडळाच्या अजब कारभाराची गजब कहाणी मिटर रिडींग वेगळी आणि नोंद मात्र वेगळी

मौजे तांबुळगाव येथील महावितरणचे ग्राहक शेषराव सोपाणे यांच्या मीटर मध्ये चालू रीडिंग 844 एवढे असताना रीडिंग करणाऱ्या कर्मचाऱ्याने पाठवलेल्या संदेशामध्ये 965 एवढी रीडिंग दाखवली आहे व बिल भरण्यासाठी सतत तगादा लावून ग्राहकाला परेशान करण्याचं काम पालम येथील महावितरणचे कर्मचारी व त्यांच्या सोबत असणारे खाजगी दलाली कर्मचारी यांनी वसुलीचा चंग मांडून खोट्या रेडींग दाखवून ग्राहकाला परेशान करीत आहेत

तरी वरिष्ठांने याकडे लक्ष द्यावे अन्यथा जोपर्यंत रीडिंग बिल पावतीवर मीटर मध्ये असणारा अाकडा येत नाही तोपर्यंत ग्राहक बिल भरू शकत नाही असे ताबुळगाव येथील महावितरण ग्राहक श्री सोपाणे यांचे म्हणणे आहे . महावितरणच्या या मनमानी कारभारास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महावितरणाच्या या अजब कारभार गजब कहानीचा नेमका मतलब काय असावा, का विनाकारण फसवणुकीचा प्रयत्न समजावा असेही सोपाने यांनी म्हटले आहे

Previous articleपाकिस्तानला लसींचा पुरवठा करण्यापेक्षा, केंद्राने त्या आधी महाराष्ट्राला द्याव्यात 🛑
Next articleप्राचार्य पी. बी. पाटील यांचे कार्य प्रेरणादायी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे प्रतिपादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here