Home कोल्हापूर प्राचार्य पी. बी. पाटील यांचे कार्य प्रेरणादायी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे प्रतिपादन

प्राचार्य पी. बी. पाटील यांचे कार्य प्रेरणादायी प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे प्रतिपादन

200

राजेंद्र पाटील राऊत

प्राचार्य पी. बी. पाटील यांचे कार्य प्रेरणादायी

प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांचे प्रतिपादन

नवे पारगाव : शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी बहुजन समाजाच्या उद्धारासाठी गुरुदेव कार्यकर्ते घडविले.त्यांनी ज्ञानाचे उपासक निर्माण केले. पाराशर शैक्षणिक संकुलाचे प्राचार्य पी. बी. पाटील यांनी समाजाच्या व संस्थेच्या हितासाठी केलेले कार्य प्रेरणादायी आहे असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांनी केले.
नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील ‘पाराशर’ चे प्राचार्य पी. बी. पाटील यांच्या सेवानिवृत्ती सत्कार प्रसंगी प्राचार्य अभयकुमार साळुंखे बोलत होते.
डॉ. नामदेव पाटील, बी.जी.करवडे, प्रभारी पर्यवेक्षक एम. बी. कुरुंदवाडे, अमित पाटील, क्रांती कांबळे, प्राचार्य पी. बी. पाटील यांची भाषणे झाली.
संस्थेचे माजी सचिव प्रा. वाय.बी.पाटील, आजीव सेवक प्रा.एस.वाय. काटे, नवे पारगाव चे सरपंच प्रदीप देशमुख, पाराशर विकास संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब मोरे, अंबपचे मुख्याध्यापक प्रदीपकुमार पाटील, विजय माने, के. एस. पाटील उपस्थित होते.

फोटो ओळी : ‘पाराशर’ चे प्राचार्य पी. बी. पाटील यांचा सत्कार करताना संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे तर पद्मा पाटील यांचा सत्कार करताना सविता पाटील.     (युवा मराठा न्युज नेटवर्क पश्चिम महाराष्ट्र )

Previous articleपालम तालुक्यामधील महावितरण महामंडळाच्या अजब कारभाराची गजब कहानी मिटर रिडींग मध्ये वेगळा आकडा रिडींग घेणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वेगळा आकडा याची वरिष्ठांनी घ्यावी दखल.
Next articleतळसंदे येथील उरूस बंद
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.