Home बुलढाणा सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी!

सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी!

166
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0056.jpg

सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे विशेष प्रतिनिधी
(युवा मराठा न्यूज नेटवर्क)

सहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली असून कार्यक्रमा प्रसंगी शाळेचे सर्व शिक्षक तसेच पालक यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच कार्यक्रमाप्रसंगी वेशभूषा करून आलेल्या चिमुकल्यांनी कृष्ण गीतावर नाचत सर्वांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमात काही मुलांनी कृष्णाच्या गाण्यावर नृत्य करून संपूर्ण वातावरण कृष्णमय बनवले होते विद्यार्थ्यांनी समूह नृत्य तसेच गोविंदा पथक दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि कार्यक्रमानंतर सर्वांनी श्रीकृष्णाची विधिवत पूजा करून गोपाळकाला करून प्रसाद घेतला.
“हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की” घोषणा देत श्रीकृष्णाचा जयजयकार केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मने मॅडम व गुजर मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे प्राचार्य योगेश घाटोळे सर यांनी केले व मुलांना कृष्ण जयंती ची माहिती देत प्रत्येक परिस्थितीचा सामना कसा करायचा हे आपण भगवान श्रीकृष्ण कडून शिकले पाहिजे. कंसाचा वध करून त्यांनी प्रजेला अत्याचारापासून मुक्त केले द्रोपतीची लाज वाचवली, श्रीकृष्णाने अर्जुनाला आत्मा, परमात्मा, योग आणि कर्म समजावून सांगितले भगवान श्रीकृष्णाने फळाची इच्छा न करता कर्म करत राहावे असा संदेश दिला खरी कृती म्हणजे निस्वार्थ भावनेने केलेली कृती त्यांनी भ्रमापासून दूर राहण्याविषयी सांगितले महाभारताचे युद्ध होऊ नये यासाठी श्रीकृष्णाने सर्वतोपरी प्रयत्न केले जेव्हा युद्ध थांबले नाही तेव्हा कृष्ण भगवान पांडवांच्या बाजूने होते कारण ते सत्तेच्या मार्गावर होते. म्हणूनच आपण नेहमी खऱ्यांचे समर्थन केले पाहिजे. असे मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.

Previous articleगडगा ते कहाळा रोडवर मोकासदरा शिवारात मोटरसायकलचा आपघात एक अत्यवस्थ तर दोन गंभीर जखमी
Next articleमुखेड कृषि अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here