Home नांदेड मुखेड कृषि अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

मुखेड कृषि अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

82
0

आशाताई बच्छाव

IMG-20220819-WA0058.jpg

मुखेड कृषि अधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

मुखेड तालुका प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर

राज्य पुस्कृत एकात्मिक कापूस पीक उत्पादन वाढ व मुल्य साखळी योजनेअंतर्गत मुखेड तालुक्यात एकूण चार प्रकारचे लक्षणे असून त्यात ४०० हेक्टर कापूस पिकावरील उत्पादनता वाढ व मुल्य साखळी योजनेचे उद्दिष्टे आहे त्यामध्ये चांडोळा जाब बुद्रुक गावाचा समावेश असून या संदर्भात तालुक्यातील मोजे जाब बुद्रुक येथील शेतकऱ्यांची शेती शाळा घेण्यात आली सदर शेती शाळेमध्ये उपस्थित शेतकऱ्यांना राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस उत्पादकता व मुल्यसाखळी योजने अंतर्गत प्राप्त झालेल्या निष्ठांचे वाटप करण्यात आले याप्रसंगी कृषी अधिकारी विकास नारनाळीकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊन मार्गदर्शन केले त्यावेळी शेतकऱ्यांना कापूस पिकावरील प्रमुख कीड त्यात मावा फुलकिडे तुडतुडे पांढरी माशी व गुलाबी आळी तसेच इतर बोंड आळी या किडीचे सविस्तर माहिती देण्यात आली त्याचबरोबर मित्र कीटक म्हणून ढालकीडा कीड त्यांचे वेगवेगळी अवस्था किडीची सविस्तर माहिती देण्यात आली जमिनीतील खते देण्याची पद्धत माती नमुना तपासणी कापूस पिकाची झिंक मॅग्नेशियम सुक्षम मूलद्रव्याचा वापर तसेच एक गाव एक वान भविष्यात शेतकरी गटाने मिळून शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करणे व त्यांच्या विक्रीसाठी किंवा जिनिंग साठी युनिट उभारणे इत्यादी बाबीची माहिती वरील मार्गदर्शन शिबिरात देण्यात आले सदरील शिबिरामध्ये मुखेड तालुका कृषी अधिकारी विकास नारनाळीकर मंडळ कृषी अधिकारी मरदोडे प्रर्यवेक्षक जाब बु बनसोडे कृषी सहाय्यक तिकटे कार्यालयाचे पीटीएम जायभायॆ कृषी सहाय्यक शृंगारे व सर्व शेतकरी बांधव महिला शेतकरी उपस्थित होते यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन कृषी अधिकारी यांनी केले

Previous articleसहकार विद्या मंदिर वरवट बकाल येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी!
Next articleमल्हार हिल कॅम्पसमध्ये दहीहंडी उत्सव साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here