राजेंद्र पाटील राऊत
स्विमींग टँक मध्ये करंट लागून जयसिंगपूरात युवकाचा मृत्यू
जयसिंगपूर : येथील कॉलेज कॅम्पसमधील स्विमींग टँक साफ करतेवेळी, टॅकमधील ईलेक्ट्रीक मोटर शॉक लागून कॉलेजचा शिपाई शितल दौलत बाबर (वय वर्ष २६) रा. शाहूनगर जयसिंगपूर या युवकाचा मृत्यू झाला.
सदर घटना आज रविवारी सकाळी साडेआठ वाजता घडली. याबाबतची वर्दी कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र रायाप्पा कुंभार यांनी जयसिंगपूर पोलिसांत दिली.
याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी, जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर मधील शितल बाबर हा गेल्या सहा वर्षापासून शिपाई आहे. गेल्या दोन दिवसापासून जयसिंगपूर कॉलेजच्या स्विमींग टँक स्वच्छता करायचे काम तो करत होता.
आज रविवारी सकाळी ७ वाजता कॉलेजमध्ये आला. या स्विमींग टँक मध्ये असलेली इलेक्ट्रीक मोटर नादूरूस्त झाल्याने पाण्यात करंट उतरला होता. यातच बाबर याने पाण्यात उतरून काम करत असताना त्याला करंट लागला. त्यानंतर तात्काळ त्यांला खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले.
परंतु ,डाँक्टरांनी त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे सांगितले. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
सदर घटनामुळे जयसिंपूर शहरातील शाहूनगर परिसरात शोककळा पसरली आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, विवाहीत बहीण असा परिवार आहे.(मोहन शिंदे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)