Home माझं गाव माझं गा-हाणं घोडेगांवचे उपसरपंच साहेबराव सरोदे यांचे अपघाती निधन गावावर शोककळा

घोडेगांवचे उपसरपंच साहेबराव सरोदे यांचे अपघाती निधन गावावर शोककळा

220
0

राजेंद्र पाटील राऊत

घोडेगांवचे उपसरपंच साहेबराव सरोदे
यांचे अपघाती निधन गावावर शोककळा
(श्रीमती आशाताई बच्छाव व्यवस्थापकीय संपादक युवा मराठा न्युज नेटवर्क)
मालेगांव, दि.११- घोडेगांव ता.मालेगांव येथील उपसरपंच व हाँटेल साक्षीचे मालक साहेबराव पुंजाराम सरोदे यांचे आज दुपारी एका अपघातात दुर्दैवी निधन झाल्याची माहिती हाती येत असून,त्यामुळे संपूर्ण घोडेगांववर शोककळा पसरली आहे.
साहेबराव पुंजाराम सरोदे हे राजकारणातील एक उमदे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात होते,त्यांनी आपली राजकारणाची सुरुवात शिवसेनेपासून केलेली होती.तर त्यांना राजकारणाचे बाळकडू हे घरातूनच लाभले होते.त्यांचे वडील पुंजाराम सरोदे हे गेल्या अनेक वर्षापासून घोडेगांवचे सरपंच म्हणून राजकारणात होते.त्यांचाच वारसा साहेबराव सरोदे यांच्या रुपाने घोडेगांव गावावर चमकून होता.साहेबराव सरोदे यांनी सोसायटी चेअरमन ग्रामपंचायतीचे सरपंच तर विद्यमान उपसरपंच अशी विविध पदे भुषविली होती.
आज दुपारी चोंढी गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत साहेबराव सरोदे हे गंभीररित्या जखमी झाले होते.त्यांना उपचारासाठी मालेगांवी नेत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.या दुदैवी घटनेमुळे घोडेगांवसह पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.साहेबराव (अण्णा) सरोदे यांना “युवा मराठा न्युज महाराष्ट्र”परिवाराची भावपूर्ण श्रध्दांजली!

Previous articleस्विमींग टँक मध्ये करंट लागून जयसिंगपूरात युवकाचा मृत्यू
Next articleमाणूस झाला सस्ता,बकरा महाग झाला! ……….पैसेने सबको खा डाला!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here