राजेंद्र पाटील राऊत
माणूस झाला सस्ता,बकरा महाग झाला!
……….पैसेने सबको खा डाला!!
सडेतोड अग्रलेख..
वाचकहो,
कोरोना महामारी संकटाने पुरते थैमान घातले आहे.जो तो आपआपल्या जीवाच्या आकांताने वेडापीसा झाला आहे.आज सर्वत्र कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघितल्यावर साहजिकच लक्षात येते की या देशातील आरोग्य यंत्रणा किती आणि कशी कमकुवत ठरली आहे.
प्रत्येकांची जीवन जगण्यासाठीची लढाई जीवघेणी व संघर्षात्मक होत चालली आहे,रोजच्या रोज कोरोनाच्या नावाने होणारी प्रेतांची हेळसांड बघितली तरी मन सुन्न होते.कालच अहमदनगर शहरात एकाच दिवशी कोरोनाने बळी गेलेल्या ४२ लोकांवर अंत्यसंस्कार करण्याची लाजीरवाणी वेळ का निर्माण व्हावी,याचे अवलोकन होणे गरजेचे आहे.
आरोग्य सुविधेचा अभाव आणि खासगी डाँक्टरांची सुरु असलेली मनमानी लुटमारी यामुळे माणूस खरोखरच सस्ता झाला आणि बकरा महाग झाला असेच हे चित्र असून,रेमिडीसिव्हर इंजेक्शनच्या नावाखाली डाँक्टरांनी अक्षरशः कसायालाही लाजवेल असेच कृत्य संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण केलेले आहे,त्यामुळे कोरोनाची धास्ती आणि भिती कमी होण्याऐवजी डाँक्टरांच्या या लुटमारीमुळे कोरोना रुग्ण व त्याचे कुटूंबिय अगोदरच मरणासन्न अवस्थेत जगत आहेत.याची शासनाला काही फिकीर आहे की नाही हा देखील गंभीर प्रश्नच आहे.
कालच मला सटाण्याच्या मुंजवाड गावातील एका महिला भेटली व तिने सांगितले की,कोरोनाच्या नावाखाली सटाण्यात कसे लुटमारीचे प्रकार सुरु आहेत याची कैफीयतच ऐकविली,असाच काहीसा प्रकार नाशिकमध्ये सुरु असल्याचे प्रतिनिधी दिलीप चव्हाण यांनी फोन करुन सांगितले.यापेक्षा वेगळी परिस्थिती कुठेच नाही,नांदेड,सातारा,कोल्हापूर भागातही अशीच परिस्थिती आहे,आज माणूस मरणाच्या दारात उभा ठाकलाय आणि रेमडीसिव्हर इंजेक्शनच्या नावाखाली भामटया भुरटया डाँक्टरांनी आपले सात पिढीचे उखळ पांढरे करुन घेण्यासाठी दुकानदारी मांडली.किती भयानकता आहे…कुठे फेडणार आहात हे पाप?देवानंतर दुसरा अवतार म्हणून डाँक्टरी पेशाकडे बघितले जाते.मात्र तेथेच जर अशी लुटमारी होत असेल,तर सामान्य जनतेने कुणाकडे अपेक्षेने बघायचे?राज्यकर्ते उदासीन,भ्रष्टाचारी प्रशासन मग तेथे सामान्य माणसांच्या जिंदगीची किंमत तरी किती राहणार आहे,एकंदरीतच काय,तर देवा तुझ्या देवळात चोरटयांचा फड असे म्हटले तर वावगे काहीच ठरु नये.एव्हढेच!! राजेंद्र पाटील राऊत मुख्य संपादक युवा मराठा न्युज महाराष्ट्र