• Home
  • सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, संध्याकाळी ८ नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद 🛑

सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, संध्याकाळी ८ नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210328-WA0045.jpg

🛑 सरकारच्या नव्या गाईडलाईन्स, संध्याकाळी ८ नंतर सार्वजनिक ठिकाणे बंद 🛑
✍️ मुंबई 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

मुंबई :⭕ राज्य सरकारने राज्यात कोरोना प्रतिबंधन म्हणून नव्या गाइडलाईन्स जाहीर केल्या आहेत.

ज्यामध्ये संध्याकाळी 8 ते सकाळी 7 पर्यंत सर्व सार्वजिनक ठिकाणे बंद राहणार आहेत. आज मध्य रात्रीपासून हे नवे नियम लागू होणार आहेत.
राज्यात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता हे नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या नियमांचं उल्लंघन केल्यास १ हजार रुपये दंड देखील आकारला जाणार आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. या शिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर 1000 रुपये दंड आकारला जाणार आहे.

– मिशन बिगीन अंतर्गत हे आदेश १५ एप्रिल २०२१ पर्यंत लागू राहतील.
– 5 किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींना रात्री ८ ते सकाळी ७ या दरम्यान एकत्र येण्यास मनाई आहे.

(जमावबंदी ). रविवारपासून याची अंमलबजावणी होईल.
– या नियमाचा भंग केल्यास प्रती व्यक्ती १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.

*- सागरी किनारे व उद्याने, बागा ही सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत बंद राहतील. भंग केल्यास प्रती व्यक्ती १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल *

– मास्क न घातलेला असल्यास त्या व्यक्तीस ५०० रुपये दंड होईल तर सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तीस १००० रुपये दंड होईल.
– मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री ८ ते सकाळी ७ बंद राहतील. मात्र या वेळात टेक होम डिलिव्हरी सुरु राहील.
याचा कुणी भंग केल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, उपाहारगृह, हॉटेल हे कोविड २०१९ साथ असुस्तोवर बंद करण्यात येईल. सबंधित आस्थापनेला दंडही ठोठावण्यात येईल.

– कुठलेही सामाजिक, धार्मिक , राजकीय कार्यक्रम , मेळावे यांना परवानगी नाही. सभागृह किंवा नाट्यगृहे या कारणांसाठी उपयोगात आणता येणार नाही.
– विवाह समारंभासाठी ५० पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई असेल. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्ती एकत्र येऊ शकणार नाहीत
– घरीच विलगीकरण ( होम आयसोलेशन) बाबतीत कोणत्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या निगराणीखाली उपचार सुरु आहेत ते स्थानिक प्रशासनाला कळवावे लागेल तसेच गृह विलगीकरणात सर्व काळजी घेण्याची जबाबदारी त्या डॉक्टरची राहील. रुग्णाने विलगीकरण नियमांचा भंग केल्यास संबंधित डॉक्टरवर त्याची माहिती लगेच स्थानिक प्रशासनाला कळविण्याची जबाबदारी राहील. ⭕

anews Banner

Leave A Comment