• Home
  • कोरोनामुळे 10 वी 12 वी ची परीक्षा हुकली तर? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

कोरोनामुळे 10 वी 12 वी ची परीक्षा हुकली तर? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210326-WA0040.jpg

कोरोनामुळे 10 वी 12 वी ची परीक्षा हुकली तर? शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली महत्वपूर्ण माहिती
प्रतिनिधी= किरण अहिरराव /युवा मराठा न्युज नेटवर्क

मुंबई : महाराष्ट्रात दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन (Maharashtra SSC and HSC exam) पद्धतीनेच होणार हे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. मात्र दिवसेंदिवस कमालीने वाढणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता, काहींना ही परीक्षा देणे खरोखरच जिकरीचे होणार आहे.

अशात काय करायचे याबाबत शिक्षणंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी झी २४ तासला माहिती दिली आहे.

दहावी-बारावीची परीक्षा देता आली नाही तर काय?

1. कोरोनामुळे दहावी आणि बारावीची परीक्षा देता आली नाही, तर जूनमध्ये विशेष परीक्षा घेतली जाणार

२.विद्यार्थ्याला किंवा त्याच्या घरातील सदस्याला कोरोना झाला, परिसरात कोरोनाबाधित अनेक असतील, इमारत/परिसर सील केला असेल, तर विद्यार्थ्याने परीक्षा देऊ नये.

३. विद्यार्थी परीक्षेला येऊ शकला नाही तर, संबंधिक शाळा/महाविद्यालयाने विद्यार्थ्याची माहिती शिक्षण मंडळाला द्यायची आहे.

४. अशा विद्यार्थ्यांना जूनमध्ये परीक्षा देता येणार आहे.

इयत्ता दहावीची लेखी परीक्षा २९ एप्रिल ते २० मे २०२१ या कालावधीत होणार आहे. तर इयत्ता बारावीची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे २०२१ या कालावधीत होणार आहे. लेखी परीक्षेसाठी अधिकचा ३० मिनिटांचा वेळ देण्यात आलेला आहे.

anews Banner

महाराष्ट्र शासनात तब्बल २ लाख १९३ जागा रिक्त : तरी बेरोजगारी वाढते का? मुंबई : (अंकुश पवार,ठाणे शहर- प्रतिनिधी, युवा मराठा न्यूज नेटवर्क) आज दि.१६.०९.२०२१ मुंबई (मंत्रालय) येथे सामान्य प्रशासन विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांच्या सोबत झालेल्या बैठकीत वाढती बेरोजगारी व महाराष्ट्र शासनात रिक्त पदांच्या भरतीसाठी चर्चा झाली. चर्चेदरम्यान शासनात तब्बल २ लाख १९३ जागा रिक्त असल्याचे समोर आले आहे. यासाठी जबाबदार कोण असा प्रश्न पडतो. या बैठकीत रिक्त पदे प्रमुख कोणत्या कारणाने आहेत याचा आढावा घेण्यात आला:१. (Maharashtra Government) शासनाच्या २९ प्रमुख विभागांमध्ये सरळसेवा व पदोन्नतीच्या मिळून तब्बल दोन लाख १९३ जागा रिक्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या रिक्त जागांमध्ये जिल्हा परिषदांमधील तब्बल ४६ हजार ९६२ जागा आहेत. २. आउटसोर्सिंग, कंत्राटीवर जोर राज्यातील बेरोजगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. अनेक तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. नोकरी मिळत नाही म्हणून अनेकांची स्थिती बिकट झाली असून तरुण वाममार्गाला लागला आहे. असे असतानाही नव्या नोकरभरती ऐवजी शासनाचा आउटसोर्सिंग, कंत्राटी पद्धतीवर अधिक जोर दिसतो. कारण निवृत्तांना पुन्हा कंत्राटी तत्त्वावर सेवेत सामावून घेतले जात असल्याचे दिसत आहे. ३. एमपीएससी’ची निवांत ढकल गाडी राज्य लोकसेवा आयोगाची सरळसेवा भरतीबाबतही संथगती पहायला मिळते. कॉललेटर, प्रशिक्षण, परिवीक्षाधीन कालावधी याला बराच वेळ लागतो आहे. आयोगाने २०१८ला फौजदार पदासाठी काढलेली जाहिरात. या पदासाठी २०१९ ला निवड झाली मात्र त्यानंतर दीड दोन वर्ष उलटल्यानंतर २०२१ मध्ये त्या उमेदवारांना प्रशिक्षणाला पाठविण्यात आले आहे. ४. वर्गवारीनुसार रिक्त पदे अ वर्ग-१० हजार ५४४ ब वर्ग-२० हजार ९९९ क वर्ग-१ लाख २७ हजार ७०५ डवर्ग-४० हजार ९४४ एकूण-२ लाख १९३ त�

By राजेंद्र पाटील राऊत

Leave A Comment