• Home
  • गजा मारणे’ स्टाइल’ पडली महागात…! जामिनावर सुटलेल्या गुंडांचा धुमाकूळ, पाच जणांना अटक 🛑

गजा मारणे’ स्टाइल’ पडली महागात…! जामिनावर सुटलेल्या गुंडांचा धुमाकूळ, पाच जणांना अटक 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210328-WA0038.jpg

✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे  –⭕ खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या गुंड आणि साथिदारांनी उत्तमनगरमधील शिवणे परिसरात फटाके वाजवले. इतकेच नव्हे, तर गुंडांनी नागरिकांना धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला.

याप्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करून पाचजणांना अटक केली आहे.

सागर भालेराव वारकरी (२१), अविनाश रामप्रताप गुप्ता (२०), आकाश सिब्बन गौड (२०), सागर राजेंद्र गौड (१९), सूरज राजेंद्र गौड (२५, सर्व रा. शिवणे) यांना अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी अभिषेक गुप्ता याच्यासह सहा ते सात साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक संतोष नांगरे यांनी उत्तमनगर पोलिसांत फिर्याद दिली आहे.

जुन्या वादातून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गेल्यावर्षी आरोपी सागर वारकरी, अविनाश गुप्ता, आकाश गौड, सागर गौड यांना उत्तमनगर पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणात न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

मंगळवारी ते कारागृहातून बाहेर आले.यानंतर आरोपी आणि साथीदार मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास शिवणेतील राहुलनगर येथील पीएमपी थांब्याजवळ आले. त्यांनी घोषणाबाजी करत फटाके फोडले. नागरिकांना शिवीगाळ करून परिसरात दहशत पसरवली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाचजणांना अटक केली. पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जगताप तपास करत आहेत.⭕

anews Banner

Leave A Comment