• Home
  • मार्च एंडिंगच्या मुहूर्तावर अनावश्यक कामांचा सपाटा; चांगले रस्ते, पदपथ तोडून नवीन करण्याचा धडाका 🛑

मार्च एंडिंगच्या मुहूर्तावर अनावश्यक कामांचा सपाटा; चांगले रस्ते, पदपथ तोडून नवीन करण्याचा धडाका 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210324-WA0060.jpg

🛑 मार्च एंडिंगच्या मुहूर्तावर अनावश्यक कामांचा सपाटा; चांगले रस्ते, पदपथ तोडून नवीन करण्याचा धडाका 🛑
✍️ पुणे 🙁 विलास पवार पुणे प्रतिनिधी युवा मराठा न्युज )

पुणे :⭕आर्थिक वर्षाचा शेवट होत असताना वर्षभर न केलेली कामे, काही विशिष्ठ हेतू ठेऊन कमी कालावधीत पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न केला जातो. यामागे नेमका कोणाचा काय उद्देश असतो हे प्राथमिक दर्शनी समजत नसले तरी, नागरिकांच्या कररूपी पैशांची काही ठराविक मंडळी मिळून नियोजनबद्ध उधळपट्टी करतात हे मात्र निश्चित झाले आहे. पुणे महानगरपालिकेच्या विविध विकास कामाचा धडाका मार्च महिना लागल्यापासून शहरभर सुरु असल्याचा दिसतोय. त्याला १५ मार्च नंतर अधिक गती आलेली आहे.

शहरात अनेक ठिकाणी चांगल्या रस्त्यांवरच पुन्हा डांबरीकरण करणे अथवा तो रस्ता सिमेंटचा करणे, चांगले पदपथ आणि सायकल ट्रॅक उखडून नव्याने बनवणे, सहा इंचाच्या फरकाने पावसाळी आणि ड्रेनेज वाहिन्या बदलणे, गल्लीबोळ कॉंक्रीट करणे असे अनेक उद्योग मोठ्या दिमाखात चालू आहेत. यावर नागरिकांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात रोष व्यक्त केला असून, आपल्याही भागात असे काही प्रकार चालू असतील तर नक्की कॉमेंट मध्ये अथवा आमच्या मेसेज बॉक्स मध्ये त्याबाबत माहिती द्या.

आपण अशा कामांवर प्रकाश टाकून हा राजरोस सुरु असलेला भ्रष्टाचार थांबवण्याचा थोडा तरी प्रयत्न करू, कारण “आभाळ फाटलंय, एक टाका माझा” एवढा जरी विचार केला तरी आपला कररूपी पैसा वाया जाणार नाही आणि जिथे खऱ्या कामांची गरज आहे तिथली कामे होतील.

चला तर मग पाहूयात अशा कामांवर काय व्यक्त होतायत पुणेकर आणि हो अशा कामांविषयी तुम्हालाही व्यक्त होता येईल, चला तर मग करा कॉमेंट… ⭕

anews Banner

Leave A Comment