आशाताई बच्छाव
चाळीसगाव प्रतिनिधी विजय पाटील- काल संध्याकाळी व रात्री चाळीसगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती व फळपिकांचे तसेच घरांचे, गोठशेड, पोल्ट्री आदींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना मी महसूल प्रशासनाला दिल्या असून त्यानुसार पंचनामे देखील सुरू झाले आहेत.
ज्या शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असेल त्यांनी नुकसानीची माहिती पीकविमा एप वर नोंदवावी किंवा कृषी विभागाला रीतसर अर्ज करून द्यावी, या अस्मानी संकटाच्या काळात केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. शेतकऱ्यांना व नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.
– आमदार मंगेश चव्हाण






