राजेंद्र पाटील राऊत
पुणे २४ मार्च ⭕युवा मराठा न्यूज प्रतिनिधी सिद्धांत चौधरी⭕
आळंदी : देहू येथील तुकाराम बीज कोणत्याही परिस्थितीत वारकरी सांप्रदाय साजरी करणारच, यासाठी आमच्यावर काही गुन्हे दाखल झाले तरी या गुन्ह्यांना सामोरे जायची आमची तयारी आहे असे बंडातात्या कराडकर यांनी रविवारी सातारा येथे सांगितले त्यानंतर वारकाऱ्यांमध्ये संभ्रम अवस्था झाली होती. आळंदी शहरातील अनेक वारकरी महाराज मंडळींनी याबाबत आम्ही सरकारने दिलेल्या आदेशानुसार संत तुकाराम महाराज बीज सोहळा पार पाडू तसेच गावागावात संत तुकाराम महाराज बीज सोहळा आणि अखंड हरिणाम सप्ताह कोरोणाच्या सर्व नियम पाळून सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकरी संप्रदायाच्या वतीने पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या कडे करण्यात आली.
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्याच्या संभ्रमाबाबात आळंदीतील महाराज मंडळींशी चर्चा आणि संवाद साधन्यासाठी आळंदी येथे पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश आले होते,याप्रसंगी आळंदी पोलिस उपायुक्त मंचक इप्पर , रामनाथ पोकळे सर, पोलिस स्टेशन चे ज्ञानेश्वर साबळे, राजाभाऊ चोपदार, हभप पृथ्वीराज महाराज जाधव, पंडीत कल्याण गायकवाड, हभप पंडीत महाराज क्षीरसागर, हभप पांडुरंग महाराज शितोळे, हभप लक्ष्मण महाराज पाटील, नगरसेवक प्रकाश कुर्हाडे, माजी नगरसेवक डि.डि.भोसले, हभप बाळासाहेब शेवाळे, हभप पुरुषोत्तम महाराज पाटील, शब्दप्रेमी संग्रामबापू भंडारे, हभप गोविंद महाराज गोरे, संजय महाराज हिवराले, अशोक साखरे आणि संप्रदायातील महाराज मंडळी उपस्थित होते.
पोलिस आयुक्त कृष्णप्रकाश म्हणाले की बंडातात्यांनी संयमी भूमिका घ्यावी, शांततेला गालबोट लागेल अस करू नये. देहूत दरवर्षी लाखो वारकरी बिजोत्सव सोहळ्यासाठी दाखल होतात. शासनाने लागू केलेल्या नियमांप्रमाणेच सोहळा साजरा करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असेल, नियम झुगारून जर सोहळा साजरा केला तर वारकरी संप्रदाय कोरोणाने बाधित होईल. संयम दाखवून, शासनाचा नियम हा सोहळा होईल. बिजोत्सव सोहळा देखील वारकरी आणि नागरिकांनी घरी बसून साजरा करावा, असं आवाहन कृष्णप्रकाश यांनी वारकरी संप्रदायाला केले आहे.
यावेळी हभप राजाभाऊ चोपदार, हभप शेवाळे महाराज, क्षीरसागर महाराज, चौधरी महाराज, पंडीत कल्याण गायकवाड, माजी नगरसेवक डि.डि.भोसले यांनी आपले मनोगत व्यक्त केले.