• Home
  • इंडियन ऑक्साईड कंपनीच्या विरोधात उपोषण करणार-संदिप फडकले 🛑

इंडियन ऑक्साईड कंपनीच्या विरोधात उपोषण करणार-संदिप फडकले 🛑

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20210323-WA0120.jpg

🛑 इंडियन ऑक्साईड कंपनीच्या विरोधात उपोषण करणार-संदिप फडकले 🛑
✍️ रत्नागिरी 🙁 विजय पवार महाराष्ट्र प्रतिनिधी युवा मराठा न्युज)

खेड:-⭕रत्नागिरी जिल्ह्यातील खेड परशुराम लोटे परिसरात इंडियन ऑक्साईड कंपनी आहे.

आज कंपनीने कामगारांना कामावर हजर राहण्यास सांगितले होते परंतु कंपनी मॅनेजमेंटने फक्त 30 कामगारांना कामावर घेण्यासाठी परवानगी दिली आणि बाकी कामगारांना कामावर न येण्यास सांगितले.कामगार युनियन आणि कामगार यांना मान्य नाही.

सर्व कामगार कामावर घ्या असे सांगण्यात आले परंतु कंपनी मॅनेजमेंट मान्य करत नाही. त्यानंतर संदिप फडकले ,पोलीस कदम साहेब आणि कंपनी मॅनेजमेंट यांची तासभर चर्चा झाली परंतु कंपनी मॅनेजमेंट सर्व कामगारांना कामावर घेण्यासाठी नकार देत आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक आणि अध्यक्ष माननीय श्री.राज ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेडचे नगराध्यक्ष माननीय वैभवजी खेडेकर आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य कामगार सेनेचे सरचिटणीस माननीय सचिन गोळे यांच्या आदेशानुसार रत्नागिरी जिल्हा कामगार सेनेचे सरचिटणीस संदिप फडकले यांनी इंडीयन ऑक्साईड कंपनीच्या विरोधात उपोषण करणार असा इशारा दिला आहे…⭕

anews Banner

Leave A Comment